Murlidhar Jadahav suddenly removed from the post of District President now he has taken the path of Shinde group

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव (Murlidhar Jadahav)यांनी तडकाफडकी जिल्हाध्यक्ष पदावरून उचलबांगडी करण्यात आल्यानंतर आता शिंदे गटाचा मार्ग पकडला आहे. शिंदे गटाचे दोनदिवसीय महाधिवेशन कोल्हापूरमध्ये होत आहे. या अधिवेशनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील सर्व आमदार, खासदार कोल्हापूरमध्ये आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर मुरलीधर जाधव यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. 

मातोश्रीवरून दीड महिना झाला, तरी संपर्क नाही

उद्या (17 फेब्रुवारी) ते समर्थक शिवसैनिकांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मुरलीधर जाधव यांनी यावेळी बोलताना मातोश्रीवरून दीड महिना झाला, तरी कुठलाही संपर्क झालेला नाही त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा सुचित मिणचेकर आणि सुषमा अंधारे यांच्यावर तोफ डागली. त्यांनीच कान भरल्याचा आरोप त्यांनी सातत्याने केला आहे. समर्थक शिवसैनिकांना सोबत घेऊन येऊन कोल्हापुरातून मिरजकर तिकटीपासून अधिवेशन ठिकाणी पदयात्रेनं जाणार असल्याचे म्हटले आहे. 

 धैर्यशील माने, यड्रावकरांवर काय म्हणाले?

शिवसेना फुटल्यानंतर जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील बंडखोरांच्या दारात जाऊन मोर्चा काढला होता. यामध्ये त्यांनी सर्वाधिक आक्रमक भूमिका हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील खासदार धैर्यशील माने आणि शिरोळचे आमदार माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विरोधात घेतली होती. आता त्यांच्यासोबत काम करण्याची वेळ येणार आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना मुरलीधर जाधव यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. 

मुरलीधर जाधव यांची तडकाफडकी उचलबांगडी

ते म्हणाले की, पक्षाची भूमिका होती म्हणून मी विरोध केला. पक्ष श्रेष्ठ आणि पक्षादेश मानणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे माझं कोणाशी वैर नसल्याचे त्यांनी सांगितले. पक्षामध्ये कोणतं पद मिळेल म्हणून जात नसून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रखर राष्ट्रनिष्ठा जोपासण्यासाठी सर्वसामान्यांविरुद्ध होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी पक्ष प्रवेश करणार असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो आदेश देतील त्याप्रमाणे कार्यरत राहू असे ते म्हणाले. 

दुसरीकडे, मुरलीधर जाधव हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतल्यानंतर यांनी मुरलीधर जाधव यांनी कडाडून विरोध केला होता. यानंतर तीन दिवसांमध्ये मुरलीधर जाधव यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली होती. 

मुरलीधर जाधव यांची शिंदे गटाशी वाढलेली जवळीक सुद्धा त्यांच्या उचलबांगडीसाठी कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कारवाईसाठी निमित्त हवे असतानाच राजू शेट्टी यांच्या भेटीनंतर ते मिळालं आणि कारवाई करण्यात आली असंही बोललं जात आहे. मुरलीधर जाधव यांची उचलबांगडी करण्यात आल्यानंतर दोन जिल्हाध्यक्ष नेमण्यात आले आहेत.  

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts