Supriya Sule reaction on supriya sule lok sabha elections abp majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Supriya Sule  on Sunetra Pawar : सुनेत्रा पवार बारामती लोकसभा लढणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या…

बारामती, पुणे :  बारामती लोकसभा मतदारसंघासाठी (Baramati News) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar)  यांच्या लोकसभा एन्ट्रीची नांदी झाली आहे. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांची माहिती आणि कार्याचा आढावा घेणारा विकास रथ शहरात फिरत आहे. त्यामुळे बारामतीत आता नणंद-भाजवयांची लढतीचे स्पष्ट संकेत आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर सुनेत्रा पवार यांची बारामती लोकसभेच्या उमेदवारीसाठी प्रचंड चर्चा होती. 

अजित पवार हे शरद पवारांपासून वेगळे झाल्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी झाले. मात्र बारामती लोकसभेसाठी अजित पवार उमेदवार कोण देणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बारामतीतील उमेदवारावर लोकसभेची गणितं अवलंबून आहे. अजित पवारांनी त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभी करावी, असं भाजपच्या नेतृत्वाला अपेक्षित आहे. त्यासोबतच बारामतीतील अजित पवारांचे कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांचीदेखील हिच ईच्छा व्यक्त केली होती. आता त्याच दिशेने अजित पवार पावलं टाकताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे  यांना प्रश्न विचारला असता त्या नेमकं काय म्हणाल्या… पाहुयात.

[ad_2]

Related posts