Shivajirao Adhalrao Patil Mhanad News pune shivajirao adhalrao patil pune mhada president shirur maharashtra news update

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे :शिवाजी आढळरावांची (Shivajirao Adhalrao  Patil) पुणे म्हाडाच्या (Pune Mhada) अध्यक्षपदी वर्णी लागली आहे, मग आता महायुतीकडून शिरूर लोकसभा कोण लढणार? याची उत्सुकता शिगेला पोहचलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आढळरावांना पुणे म्हाडाचे अध्यक्षपद देऊन, त्यांना शिरूर लोकसभेच्या रिंगणातुन बाहेर तर काढण्यात आलं नाही ना? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला असून मतदारसंघात या चर्चेला उत आलाय. मात्र या चर्चां शिवाजी आढळराव पाटलांची खोडून काढल्या आहे. म्हाडाच्या अध्यक्षपदासाठी लोकसभा निवडणूक न लढवणाऱ्यापैकी मी नाही, मी लोकसभा निवडणूक लढवणार आणि जिंकणार देखील, असा दावा त्यांनी केला आहे. 

पुणे म्हाडाच्या अध्यक्षपद देऊन त्यांना बाजूला सारण्याचा प्रयत्न झाल्याचं दिसत आहे असंच घडणार असेल तर मग आढळरावांना म्हाडाचे अध्यक्षपद बहाल करण्याची शाळा नेमकी कोणाची असेल? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहे. आता आढळरावांना जर शिरुर लोकसभेच्या रिंगणातून बाहेर काढण्यासाठी ही खेळी खेळली गेली असेल तर मग महायुतीकडून शिरूर लोकसभेच्या रिंगणात कोणता उमेदवार उतरवला जाणार? याबाबतची उत्सुकता आणखीच शिगेला पोहचलेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विद्यमान खासदार अमोल कोल्हेची घोडेस्वारी रोखण्याचा चंग बांधलाय. तसं जाहीर आव्हानच अजित पवारांनी कोल्हेंना दिलंय. पण घड्याळाचा चिन्हावर उभं राहणारा आणि कोल्हेचा काटा काढणारा तो तुल्यबळ उमेदवार कोण असणार? शिवाजी आढळरावांना पुणे म्हाडाचे अध्यक्ष पद दिल्यानंतर या चर्चांना पुन्हा उत आला आहे. 

काय म्हणाले शिवाजी आढळराव पाटील??

मात्र याच सगळ्या चर्चांणा आढळराव पाटील यांनी पूर्णविराम दिला आहे. एबीपी माझाशी बोलताना ते म्हणाले की,  म्हाडाचं अध्यक्षपद ही मोठी बाब आहे, असं वाटत नाही. मी करवीर नगरीत आलो आणि म्हाडाचे अध्यक्ष पद मिळालं हा मी योगायोग समजतो. सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घराची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे दिलेली आहे. ही जबाबदारी चांगली पेलणार असल्याची खात्री असल्याचं ते म्हणाले. 

म्हाडाच्या पदासाठी लोकसभा सोडणाऱ्यातला मी नाही!

लोकसभेच्या उमेदवारीचा आणि या म्हाडाच्या अध्यक्षपदाचा काहीही संबंध नाही. मी  लोकसभेच्या निवडणुकीला उभा राहणार हे ठरलं आहे. त्यात कोणातही बदल करण्यात आला नाही. आपला मतदार संघ नीट सांभाळायचा आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे मी निवडणूक लढणार आहे आणि निश्चितपणे जिंकून येणार असल्याचा विश्वास आढळराव पाटलांनी व्यक्त केला आहे. म्हाडाच्या पदासाठी लोकसभा सोडणाऱ्यातला मी नाही, असं त्यांनी ठणकावून सांगितलं आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Pune Lonavala Mega Block :पुणे-लोणावळा मार्गावर 18 फेब्रुवारीला मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहून घ्या!

 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts