Pune crime news 3 Pune cops dismissed from service for stealing Rs 45 L ‘hawala’ cash in 2022

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : पुण्यात सध्या पोलिसांवरच धडाधड करावाया सुरु असल्याचं दिसत आहे. त्यातच आता  पोलीस असल्याचे सांगून गाडीतील हवालाचे 45 लाख रुपये लुटणार्‍या पुणे शहर पोलीस (Pune City Police) दलातील तीन कर्मचार्‍यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. नाशिक मुंबई महामार्गावरील (Nashik Mumbai Highway) दिवे गावात कार अडवून पोलीस असल्याचं सांगून लूट केली होती. त्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली. आता अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील (IPS Pravinkumar Patil) यांनी ही कारवाई केली आहे.

पुण्यातील पोलीस शिपाई गणेश मारुती कांबळे, गणेश बाळासाहेब शिंदे, दिलीप मारुती पिलाणे अशी बडतर्फ केलेल्या पोलिसांची नावे आहेत. 8 मार्च 2022 ची ही गोष्ट आहे. या तिघांनीही मिळून  भिवंडीजवळील दिवे गावात लूटलं होतं. त्यानंतर या तिघांनाही बडतर्फ करण्यात आलं होतं आणि या सगळ्यांची कसून चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत तिघेही दोषी आढळले आणि त्यानंतर त्यांनंतर त्यांना बडतर्फ करण्यात आलं आलं.

 नेमकं काय घडलं होतं?

8 मार्च 2022 ला हा प्रकार घडला होता. बडतर्फ करण्यात आलेले तीन पोलीस हे पुण्यातील दत्तवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. दिलीप पिलाणे यांच्या बहिणीचा धार्मिक कार्यक्रम असल्यामुळे हे तीन पोलीस कर्मचारी आणि त्याचा मित्र बाबूभाई सोळंकी हे पुण्यातून दिवे गावात गेले. त्याच वेळी गेम फिरला बाबुभाईच्या भावाने दिलेली एक माहिती ऐकून तिघांनी प्लॅन आखला. बाबुभाईच्या भावाने हवालाचे पैसे औरंगाबादमधून नाशिक मार्गे ठाणे येथे जाणार असल्याची माहिती दिली. त्यानंतर तिघांनी मिळून हवालाचे पैसे लुटण्याता प्लॅन केला आणि थेट भिवंडीजवळील दिवे गावात रामलाल परमार यांची हवालाचे पैसे घेऊन जाणारी कार अडवली. पोलीस असल्याचा धाक दाखवला आणि वाहनाची तपासणी केली. त्यानंतर कारवाई करत असल्याचं सांगून भीती दाखवली आणि 45 लाख रुपये घेतले.

 यानंतर या तिघांवर जबरी चोरीचा गुन्हा नारपोली पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र या तिघांनी अटक चुकवण्यासाठी थेट वेगवेगळ्या आजारांची कारणं दिली. गणेश कांबळेने सीक पाल मिळवला.गणेश शिंदे याने प्रशिक्षण काळात ली साप्ताहिक सुट्टी घेत असल्याचं सांगितलं आणि त्यांच्यासोबत असलेला पिलाणे यानेदेखील सुट्टी घेतली आणि तिघांनी मिळून हा कट रचला मात्र यात तिघेही सापडले. अखेर त्यांची चौकशी करण्यात आली आणि त्यांना पोलिसांची प्रतिमा मलिन केल्याने बडतर्फ करण्यात आलं. 

इतर महत्वाची बातमी-

Pune Supriya Sule : दादा-ताईत तू तू मै मै सुरुच! लोकसभेत आम्हाला मुद्दे मांडण्यासाठी निवडून दिलं; सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना सणसणीत टोला

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts