The bullying happening in Baramati has been strongly criticized by tweeting Rohit Pawar referring to Ajit Pawar group as Malida Gang

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Rohit Pawar : अजित पवार यांनी राष्ट्रवादी फोडून पक्षाला सुरुंग लावल्यानंतर आता अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यातील बारामती लोकसभा मतदारसंघातील वाद दिवसागणिक टोकाला जात आहे. या मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना कोणत्याही परिस्थितीत पाडण्यासाठी अजित पवार गटाकडून ताकद लावली जात आहे. अजित पवार गटाकडून अत्यंत आक्रमकपणे बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रचार केला जात आहे. अजित पवार यांच्याकडून शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर कठोर शब्दात टीका सुरु आहे. 

हे सुरू असताना जातात आमदार रोहित पवार हे सुद्धा तयार वादामध्ये उतरले आहेत. त्यांनी बारामतीमध्ये होत असलेल्या दादागिरीवर ट्विट करून जोरदार टीका केली आहे. रोहित पवार यांनी अजित पवार गटाचा उल्लेख मलिदा गँग असा करत इशारा दिला आहे.

रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे की, अनेक वर्षांपासून पवार कुटुंबावर असलेल्या बारामतीकरांच्या प्रेमाच्या कर्जातून कधीही उतराई होता येणार नाही. पण याची जाणीव ठेवण्याऐवजी आज आदरणीय पवार साहेबांच्या बाजूने कुणी बोललं किंवा सोशल मिडियात व्यक्त झालं तर त्याला नोकरीवरून काढण्याचा आणि त्याच्यावर दादागिरी करण्याचा उद्योग #मलिदा_गँग करतेय.. आजवर कधी असं घडलं नाही, पण विचारांच्या आणि निष्ठेच्या बाजूने असलेल्या लोकांचे रोजगार घालवले जात असतील तर अनेकांना राजकीय बेरोजगार करण्याची ताकदही याच बारामतीकरांमध्ये आहे, हे कुणाच्यातरी तालावर नाचणाऱ्या #मलिदा_गँग नेही लक्षात ठेवावं!

गेल्या काही दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये नणंद विरुद्ध भावजय असाच सामना रंगणार असल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांत दोनवेळा बारामती लोकसभा मतदारसंघाचा अजित पवार यांनी केला. या दौऱ्यामध्ये अजित पवार यांनी थेट शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावरती हल्ला चढवला. दुसरीकडे, शरद पवार गटांकडूनही अजित पवारांकडून होत असलेल्या हल्ल्याला कडाडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. त्यामुळे बारामती मतदारसंघ आतापासूनच हाय व्होल्टेज झाला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts