Shiv jayanti 2024 Shivjayanti Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024 celebration raigad shivneri and all over maharashtra marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : आज 19 फेब्रुवारी रोजी तारखेनुसार, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यासह देशात शिवजयंती (Shiv Jayanti) मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे. राज्यासह देशभरात शिवप्रेमींमध्ये उत्साह दिसून येत आहे. ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांची 394 वी जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिरवणुकीचं  आयोजन करण्यात आलं आहे.

किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीनिमित्त शासकीय जयंती सोहळा पार पडणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. सोलापुरात शिवजन्मोत्सव, मध्यरात्री 12 वाजता पाळणा सोहळा साजरा तर आग्रा किल्ल्याच्या दिवान-ए-आममध्ये छत्रपती शिवरायांची शौर्यगाथा पुन्हा एकदा गुंजणार 

19 तारखेला शिवनेरीवर शिवजयंती सोहळ्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. अकराशे पोलीस आणि होमगार्डचा बंदोबस्त तैनात असणार आहे. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संपूर्ण काळजी घेण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

शासकिय कार्यक्रम लवकर संपवणार आहे. त्यामुळ  दहा वाजल्यानंतर  शिवभक्तांनी गड चढायला सुरुवात करावी.गडावरील शिवजंतीचा पाळणा पार पडल्यानंतर मुख्यमंत्र्यांची सभा होत असते. यावेळेस या सभेचे ठिकाण बदलण्यात आलंय. दरवर्षी या सेभेचे ठिकाण गडाच्या सुरुवातीलाच असायचे यावेळी ही सभा गडावरच पण शिवजन्माच्या ठिकाणाच्या पलिकडे होणार आहे. त्यासाठी पुरातत्व विभागाने परवानगी दिली आहे. 

आग्रा किल्ल्याच्या दिवान-ए-आम मध्ये छत्रपती शिवरायांची शौर्यगाथा पुन्हा एकदा गुंजणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ३९४ वा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीने या कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आलय. महाराष्ट्र शासन यामध्ये सहआयोजक आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री सुधीर मुनगंटीवार केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह अन्य मान्यवर

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts