ABP Majha Headlines 10 AM 19 February 2024 Maharashtra News shiv jayanti 2024 shivneri fort cm eknath shinde

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP Majha Headlines : 10 AM : 19 February 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सछत्रपती शिवाजी महाराजांची आज ३९४वी जयंती, किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवजन्मोतस्व सोहळा

सोलापुरात शिवजन्मोत्सव, मध्यरात्री १२ वाजता पाळणा सोहळा साजरा तर आग्रा किल्ल्याच्या दिवान-ए-आममध्ये छत्रपती शिवरायांची शौर्यगाथा पुन्हा एकदा गुंजणार.

अमरावतीच्या राजापेठ उड्डाणपुलावर पुन्हा एकदा शिवरायांच्या पुतळ्यासाठी चौथरा तयार, पोलिसांचा तगडा बंदोबस्त, दंगल नियंत्रण पथकही तैनात.

शरद पवार गटातील बड्या नेत्याबाबत केवळ अफवा,विरोधकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न जयंत पाटील यांचा आरोप.

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाच्या याचिकेवर आज सुनावणी, चिन्ह, पक्ष अजित पवार गटाला दिल्याच्या विरोधात शरद पवार गटाची सर्वोच्च न्यायालयात याचिका.

मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज दहावा दिवस, सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी न झाल्यास २१ तारखेला आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार, जरांगेंचं स्पष्टीकरण.

२० मे २०२२ ला शिंदे वर्षावर रडत आले होते आणि एका महिन्यात भाजपसोबत गेले, माणूस म्हणून शिंदे अपयशी ठरले, मुख्यमंत्री शिंदेंची नक्कल करत आदित्य ठाकरेंचा निशाणा.

‘राज्यातील गणवेश योजनेच्या कापड खरेदीचे टेंडर रद्द करा’ सपा आमदार रईस शेख यांची मागणी. टेंडरमधील अटी गुजरातच्या कापड उत्पादकांच्या फायद्याच्या शेख यांचा आरोप.

[ad_2]

Related posts