Ashadi Wari 2023 Shri Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Processions Start From Alandi

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ashadhi Wari 2023 : आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2023) पालखीचं प्रस्थान झालं आहे.  या पालखी सोहळ्यासाठी अलंकापूरी  (Ashadhi wari 2023) सजली आहे. लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पालखी प्रस्थान सोहळा पार पडला. मंदिर परिसरात सगळीकडे आनंंदाचं वातावरण आहे. वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर वारीचा आनंद आणि समाधान दिसत आहे. 

इंद्रायणीच्या काठावर हजारो वारकरी दाखल झाले आहेत. याच वारकऱ्यांच्या टाळ मृदुंगाच्या गजरात आज पालखी प्रस्थान सोहळा पार पडणार आहे. सकाळपासून या पालखी सोहळ्यासाठी लगबग सुरु होती. टाळ मृदुंगाच्या गजरात वारकरी पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहे. आळंदी नगरी दुमदुमली आहे. टाळ मृदुंगाच्या गजरात वारकरी दंग झाले आहेत. आजचा पालखीचा मुक्काम आळंदीतच असणार आहे. उद्या ही पालखी पुण्यात दाखल होणार आहे.

सुख, दु:ख विसरुन वारकरी वारीत दंग

वारीत सहभागी होणारे वारकरी बहुतांश शेतकरी असतात. आपल्या शेतातील कामं आटपून विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी वारकरी सज्ज झाले आहेत. दोन दिवसांपूर्वीपासूनच वारकरी आळंदीत दाखल व्हायला सुरुवात झाली होती. प्रत्येक वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर विठुरायाच्या प्रति असलेलं प्रेम आणि श्रद्धा दिसत होती. त्यात यंदा अवकाळी पावसाने बळीराज्याचं मोठं नुकसान झालं आहे. अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने राज्यातील शेकडो शेतकऱ्यांची पीकं आडवी झाली. या सगळ्या संकटाला तोंड दिल्यानंतर पुन्हा एकदा बळीराजा सुखी होऊ दे, असं साकडं घालण्यासाठी वारकरी पंढरीकडे रवाना होणार आहे. सुख दु:ख विसरुन विठुरायाचं पुन्हा एकदा वारकरी सज्ज झाल्याचं बघायला मिळत आहे.

पालखीचा विसावा कुठे कुठे ?

सोहळ्यात श्रींचा पालखी सोहळा पुण्यनगरीत दोन दिवस पाहुणचार घेत 14 जूनला सासवड मुक्कामास दिवे घाटातून हरिनाम गजरात मार्गस्थ होईल. 14 आणि 15 जूनला सासवड मुक्काम, 16 जूनला जेजुरीकडे प्रस्थान, 17 जूनला जेजुरीला मुक्काम, 18 जूनला लोणंद येथे सोहळा विसावेल. 19 जूनला अधिक एक दिवसाचा मुक्काम आणि 20 जूनला तरडगाव, 21 जूनला फलटणकडे प्रस्थान आणि 22 जूनला फलटणमध्ये मुक्काम, 23 जूनला नातेपुते, 24 जूनला माळशिरस मुक्काम, 25 जूनला वेळापूर, 26 जूनला भंडी शेगाव, 27 जूनला वाखरी, 28 जूनला पंढरपूर, 29 जूनला आषाढी एकादशी सोहळा साजरा होईल. पालखी सोहळ्यात फलटण येथे 21 जून, बरड येथे 22 जूनला एक दिवसांच्या मुक्कामासाठी सोहळा विसावणार आहे.

 

हे ही वाचा- 

Ashadhi wari 2023 : मोठी बातमी! पालखी सोहळ्याला गालबोट? आळंदीत वारकरी आणि पोलिसांमध्ये वाद; नेमकं काय घडलं?

[ad_2]

Related posts