गिरीश महाजनांची ठाकरे पिता-पुत्रावर जोरदार टीका; म्हणाले, “त्यांना आता ABCD पासून सुरुवात करायचीय”

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Girish Mahajan : मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरेंना आता एबीसीडीपासून सुरुवात करायची आहे, असे त्यांनी म्हटले. तसेच एक गट पक्ष फोडतो तर दुसरा गट घर फोडतो अशा प्रकारची टीका शरद पवार गटाच्या वतीने भाजपवर केली जात आहे, यावरदेखील गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे.  

जळगाव (Jalgaon) येथे पत्रकारांशी संवाद साधताना गिरीश महाजन म्हणाले की, आपला पक्ष आणि कुटुंब सांभाळायची जबाबदारी ज्याची त्याची आहे. आम्ही तुमचे कुटुंब सांभाळावे, असे तुम्हाला वाटते आहे का? तुमच्या पक्षात आठ लोक उरलेत त्यांना सांभाळून ठेवा नाहीतर रोज बातम्या येताय हा चालला, तो चालला. सभा घेणे, कार्यक्रम घेणे हे तर त्यांचे कामच आहे. कारण आता त्यांना पुन्हा एबीसीडीपासून सुरुवात करायची आहे, अशी टीका गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे.

ते पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरेंकडचे आमदार खासदार निघून गेले आहेत. त्यामुळे त्यांना आता सुरुवातीपासून प्रयत्न करायचे आहेत. शरद पवार (Sharad Pawar) साहेबांची देखील तीच परिस्थिती आहे. आता त्यांना दिसत आहे की, पक्ष कसे फुटतात. शरद पवार साहेबांनी पण तेच केले आहे. ते सुद्धा असेच बाहेर पडून मुख्यमंत्री झाले होते ते हे का विसरत आहेत. दुसऱ्याकडे बोट दाखवताना चार बोट आपल्याकडे असतात हे त्यांनी विसरता कामा नये, असा टोला शरद पवारांना लगावला.  

मराठा आरक्षणावर काय म्हणाले गिरीश महाजन?

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर उद्या विशेष अधिवेशन होणार आहे. याबाबत गिरीश महाजनांना विचारले असता ते म्हणाले की, मागासवर्ग आयोगाचा अहवाल आता प्राप्त झाला आहे. उद्या एक दिवसाचा अधिवेशन बोलवले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातला उद्या ठराव केला जाईल. सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न आमचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच सरकार करत आहे. तात्पुरत्या स्वरूपाचं नाही तर टिकणार आरक्षणा आम्हाला द्यायचे आहे. सर्वोच्च न्यायालयाने ज्या क्युरी काढल्या होत्या, त्या क्युरींची दुरुस्ती आम्ही केली आहे. मराठा समाजाला आरक्षण आम्हाला द्यायचे आहे. उद्या हा ठराव पारित होईल, असे त्यांनी म्हटले.

आणखी वाचा 

‘आदित्य ठाकरेंकडे कोणतेही भांडवल शिल्लक नाही, गल्ली बोळातील नेत्यांसारखी त्यांची अवस्था’; गुलाबराव पाटलांचा टोला

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts