What is the roll in Hatkanangale and Sangli loksabha there a discussion with Raju Shetti or not clear disclosure from Jayant Patil

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Jayant Patil : आगामी लोकसभा (Loksabha Election 2024) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्याशी चर्चा सुरू असल्या तरी अजून त्यामध्ये कोणतेही एकमत झालं नसल्याचं स्पष्ट आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी हातकणंगले (Hatkanangle Lok Sabha constituency) आणि सांगलीच्या (Sangli Lok Sabha constituency) जागेवरून भूमिका स्पष्ट केली. राजू शेट्टी यांनी चर्चा केली आहे का? या संदर्भातही भाष्य केले.

शरद पवार गटाला हातकलंगले आणि सांगलीसाठी वातावरण चांगलं

जयंत पाटील यांनी आज बोलताना सांगितले की शरद पवार गटाला हातकलंगले आणि सांगलीसाठी वातावरण चांगलं आहे. राजू शेट्टी यांनी आमच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा केली नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं. त्यामुळे महाविकास आघाडीकडून हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा राजू शेट्टी यांना सोडण्यात येणार असल्याची चर्चा असली, तरी महाविकास आघाडीकडून कोणत्याही प्रकारे दुजोरा देण्यात आलेला नाही. जागा वाटपामध्ये हातकणंगलेची जागा ठाकरे गटाला सुटण्याची शक्यता असून तीच जागा राजू शेट्टी यांच्यासाठी रिक्त ठेवेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

दुसरीकडे जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक यांच्यासाठी सुद्धा हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून चर्चा सुरू आहे. हा मतदारसंघ नेमका महाविकास आघाडीमार्फत लढला जाणार की राजू शेट्टी यांच्यासाठी मार्ग प्रशस्त करून दिला जाणार? याकडे लक्ष आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि ठाकरे यांच्याशी चर्चा झाली असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतही चर्चा झाली असून तिन्ही पक्षांमध्ये समन्वय झाला असल्याचे त्यांनी नमूद केले. 

रावेर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गट लढणार

दरम्यान रावेर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गट लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या ठिकाणावरून एकनाथ खडसे यांनी तब्येतीच्या कारणास्तव लढण्यास असमर्थता दर्शवली आहे, त्यामुळे महाविकास आघाडीमधील शिवसेना ठाकरे गट काँग्रेस आणि वंचित बहुजन चर्चा केल्यानंतर उमेदवार निश्चित होईल असं त्यांनी यावेळी सांगितलं. 

गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सातत्याने होत आहे. या चर्चेवर त्यांनी मौन सोडताना दर आठ दिवसांनी माझ्या नावाची चर्चा केली जाते असं म्हणत त्यांनी या शक्यता फेटाळून लावल्या. त्याचबरोबर महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी षड्यंत्र असल्याचा आरोपी त्यांनी यावेळी केला. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts