Shani will rise in the month of March These zodiac signs are advised to be alert

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Shani Uday: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह एका ठराविक कालानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी काही ग्रह राशी परिवर्तन करतात, तर काही ग्रह उदय आणि अस्त देखील होतात. कर्मदाता आणि न्यायदेवता शनिदेव हा वैदिक ज्योतिषात महत्त्वाचं स्थान आहे. असंच येत्या मार्च महिन्यात शनीचा उदय होणार आहे.

सूर्य कुंभ राशीत पोहोचल्यामुळे शनि अस्त झाला आहे. येत्या 17 मार्च रोजी शनीचा उदय होणार आहे. त्यामुळे 3 राशीच्या लोकांवर अधिक प्रभाव पडू शकणार आहे. मात्र शनीचा उदय काही राशींच्या व्यक्तींसाठी धोकादायक ठरी शकणार आहे. जाणून घेऊया या काळात कोणत्या राशींच्या व्यक्तींनी सतर्क रहायचं आहे. 

तूळ रास

या काळात तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की तुम्ही अनावश्यक काळजी टाळली पाहिजे. तुम्ही वाद टाळले पाहिजेत. म्हणजे जर दोन लोकांमध्ये वाद होत असतील तर त्यात सहभागी होऊ नका. बेकायदेशीर गोष्टींपासून देखील दूर राहणे आवश्यक आहे. तुमच्या कामात कोणत्या ना कोणत्या कारणाने अडथळे येण्याची शक्यता आहे.

मकर रास

मकर आणि कुंभ या दोन्ही राशींचे स्वामी असल्यामुळे या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. कोणत्याही विषयात निर्णय घेताना आत्तापर्यंत जो गोंधळ उडू शकतो. कौटुंबिक जीवनात आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा अन्यथा नात्यात दुरावा येण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या कामात कोणत्या ना कोणत्या कारणाने अडथळे येण्याची शक्यता आहे. तुम्हाला मित्र आणि नातेवाईकांमुळे अडचणींचा सामना करावा लागणार आहे. 

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांनी या सर्व शुभ गोष्टींबाबत सावध राहावं लागणार आहे. कामाचा आणि नैतिकतेचा ताण वाढणार आहे. मेहनतीपासून दूर राहणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागेल. तुमच्या सुखसोयी कमी होण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही गाडी चालवताना विशेषतः सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.  रागामुळे केलेले काम बिघडण्याची शक्यता आहे. या राशीच्या व्यापाऱ्यांना नुकसान होणार आहे. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts