एम आय एम पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष व पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ता मा.धम्मराज साळवे यांनी आपल्या सर्व पदाचा राजीनामा देत पद्मविभूषण मा.शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष -शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष मा.तुषार कामठे यांनी त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान करत त्यांची पिंपरी चिंचवड शहराच्या वरिष्ठ उपाध्यक्ष पदी नियुक्ती करून त्यांना नियुक्ती पत्र दिले. पदभार स्विकारल्यानंतर धम्मराज साळवे यांनी असे मत व्यक्त केले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष -शरदचंद्र पवार पक्ष पिंपरी चिंचवड वरिष्ठ उपाध्यक्ष पदाची जबाबदारी शहराध्यक्ष तुषार भाऊ कामठे यांनी माझ्यावर…
Read MoreDay: August 20, 2024
चिखली भागातील गुंडा पुंडांना कोणाचा आशीर्वाद?
– अजित गव्हाणे यांच्यासमोर नागरिकांनी मांडली मनातील खदखद भोसरी 20 ऑगस्ट (pragatbharat.com) : चिखली या भागातील मोरेवस्ती, म्हेत्रेवस्ती, नेवाळेवस्ती व आजूबाजूच्या परिसरात सतत होणाऱ्या चोऱ्या, घरफोडी, मारामारी व वाढत असलेल्या गुन्हेगारीमुळे नागरिक त्रस्त आहेत. या भागात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे फोफावले आहेत. रात्रीच्या वेळी निर्धास्तपणे महिला या भागातून फिरू शकत नाही. चोरीच्या, गुंडा पुंडांच्या भीतीने नागरिक प्रचंड भीती आणि दहशतीच्या वातावरणात असून नक्की आम्ही पिंपरी चिंचवड शहरात राहतो का असा प्रश्न पडतो असा संताप नागरिकांनी व्यक्त केला. चिखली, नेवाळेवस्ती, मोरेवस्ती या भागांमध्ये स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी नागरिकांच्या गाठीभेटी…
Read Moreनाना काटे यंदा आमदार होणारच – पार्थ पवार , नाना काटे यांच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
चिंचवड, १६ ऑगस्ट :चिंचवडमधून आम्ही विठ्ठल उर्फ नाना काटे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. नाना आमदार झाले पाहिजे अशी येथील नागरिक, पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे असे राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार म्हणाले. यासाठी आम्ही चिंचवड मतदार संघात मोर्चेबांधणी केली आहे असेही पवार म्हणाले. नाना काटे यांच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पार्थ पवार बोलत होते. कार्यक्रमाला खासदार श्रीरंग आप्पा बारणे , माजी महापौर संजोग वाघिरे, नितीन आप्पा काळजे, अखिल भारतीय राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष धीरज शर्मा, माजी उपमहापौर प्रभाकर वाघिरे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर,…
Read Moreभारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना राहुल दादा कलाटे फाउंडेशनच्या वतीने रक्तदान महायज्ञातून अभिवादन
पिंपरी: भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना राहुल दादा कलाटे फाउंडेशनच्या वतीने रक्तदान महायज्ञातून अभिवादन केले. चिंचवड विधानसभा मतदारसंघांमध्ये स्वातंत्र्यदिनी १२ ठिकाणी रक्तदान करून सामाजिक भान जपले. सुमारे एक हजार बाटल्या रक्त संकलन करण्यात आले. रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ असा विविध सामाजिक संघटनांतर्फे प्रचार आणि प्रसार करण्यात येतो. मात्र, रक्तदात्यांची गेल्या काही वर्षांत संख्या कमी झाली आहे. ही गरज ओळखून युवा नेते राहुल कलाटे यांच्या वतीने १२ ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत राबविण्यात आला होता.युवा नेते राहुल कलाटे म्हणाले, ‘ देशात १२० कोटी लोकसंख्या असूनही…
Read More