पिंपरी ;संत तुकाराम नगर, पिंपरी, पुणे येथे काल गुरुवारी दि 22 ऑगस्ट रोजी पुणे गृह निर्माण मंडळाचे नव निर्वाचित अध्यक्ष मा. खासदार श्री. शिवाजीरावदादा आढळराव पाटील यांचा भव्य नागरी सत्कार सर्व सामाजिक तसेंच गणेशोत्सव, दुर्गाउत्सव मंडळे तसेच विविध सोसायटी यांचे वतीने कामगार नेते मा. नगरसेवक श्री. यशवंतभाऊ भोसले यांचे हस्ते करण्यात आला.या वेळी प्रचंड संख्येने जनसमुदाय उपस्थित झालेला होता. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे मूर्तीस पुष्प अर्पण करून कार्यक्रमास सुरवात झाली.म्हाडाचे वसाहतीची स्थापना झाले पासून गेल्या चाळीस वर्षात संत तुकाराम नगर वसाहतीला भेट देणारे श्री. शिवाजीरावदादा आढळराव पाटील हे पहिलेच…
Read More