लोकांचे प्रश्‍न सोडविणाऱ्या राहुलला एक संधी द्या : शरद पवार

पिंपरी, ता. १४ : (pragatbharat.com)‘टेंडर’ मध्ये लक्ष घालणारा नव्हे तर; लोकांचे प्रश्‍न सोडविणारा कार्यकर्ता म्हणून राहुल कलाटेची ओळख आहे. तुतारीच्या जागृतीने जागे झालेल्या लोकांच्या मताने विकासाची गंगा आणायचे काम राहुलकडून केले जाईल याची मला खात्री आहे. त्यामुळे त्याला एकदा संधी द्या, अशी भावनीक साद राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी गुरुवारी (ता. १४) वाल्हेकरवाडी येथील सभेत चिंचवडच्या मतदारांना घातली. महाविकास आघाडीच्या वतीने  राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत शरद पवार बोलत होते. यावेळी उमेदवार राहुल कलाटे, माजी खासदार विदुरा…

Read More

मोशीकर म्हणतात, ‘बफर झोन’चा प्रश्न सोडवला म्हणून महेशदादासोबत!

पिंपरी-(pragatbharat.com)अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला आणि तत्कालीन आमदारांनी दुर्लक्ष केलेला मोशी येथील ‘बफर झोन’चा प्रश्न आमदार महेश लांडगे यांच्यामुळेच सुटला आहे. लांडगे यांच्या पाठपुराव्याने ‘बफर झोन’ची हद्द ५०० मीटरवरून १०० मीटर इतकी कमी करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे आम्ही महेश लांडगे यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही मोशीकरांनी दिली. या भागातून विजयी मताधिक्य देण्याचा निर्धार केला. भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी- आरपीआय व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार महेश लांडगे यांनी मोशीतील आदर्शनगर, खान्देशनगर, गंधर्वनगरी, तापकीरनगर, फातिमानगर, संत ज्ञानेश्वरनगर परिसरातील सर्व कॉलनीतील नागरिकांच्या आपुलकीच्या गाठीभेटी घेतल्या. चंद्रकांत नखाते, वंदना आल्हाट,…

Read More

भोसरी, पिंपरी , चिंचवडमधील महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी निवडणूक हातात घ्या- शरद पवार

भोसरी 13 नोव्हेंबर;(pragatbharat.com) महाराष्ट्र राज्य हातामध्ये द्या ,तुम्हाला खात्री देतो महाराष्ट्राचा चेहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. महिलांचे संरक्षण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, युवकांच्या हाताला काम अशा अनेक गोष्टी करायच्या आहेत.त्यासाठी तुमची भूमिका महत्त्वाची आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार बुधवारी भोसरी येथील सभेत म्हणाले. एकेकाळी देशात महाराष्ट्र क्रमांक एकचे राज्य होते. आज प्रत्येक बाबतीत महाराष्ट्राची घसरण सुरू आहे. गेल्या आठ वर्षाच्या भाजपच्या राजवटीत दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर फेकले गेले आहे .महाराष्ट्राला गतवैभव मिळवून द्यायचे असेल तर राज्य महाविकास आघाडीच्या हातात द्या महाराष्ट्राला पुन्हा गतवैभव दिल्याशिवाय स्वस्थ बसणार…

Read More

शिक्षक विधानसभा निवडणुकीत व्यस्त असल्यानं मुलांना मिळणार 3 दिवस सुट्टी

शिक्षक या निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने 18, 19 आणि 20 असे तीन दिवस शाळांना सुट्टी देण्याची विनंती राज्याच्या शिक्षण विभागाने शाळांना केलीय. मुंबई -(pragatbharat.com) विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता अवघे काही दिवस उरले आहेत. अशातच या निवडणुका सुरळीत पार पडाव्यात, यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली असून, विविध ठिकाणी स्ट्राँग रूम तयार करण्यात आल्यात. खरं तर निवडणुकीतील मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी प्रामुख्याने शिक्षकांवर असते. त्या काळात शिक्षकच मतदान केंद्रांवर मतदार यादी तपासणे, मतदाराच्या बोटाला शाही लावणे आणि इतर कामे पाहत असतात. आता सध्या या शिक्षकांचे ट्रेनिंग सुरू असून, 20 तारखेला…

Read More

आमदार सुनील शेळके यांना नरेंद्र मोदींचा आशीर्वाद ‘विजयी भव’..!

पंतप्रधान मोदी यांनी दिला मावळातील भाजप मतदारांना थेट ‘संदेश’ पुणे (pragatbharat.com.com):- मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- भाजप- शिवसेना- आरपीआय- एसआरपी महायुतीचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांना आज भाजपचे सर्वोच्च नेते व  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आशीर्वाद मिळाले.  महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांची आज (मंगळवारी) रात्री पुण्यातील स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभा झाली. या सभेतील भाषणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदी यांना शेळके यांची औपचारिक ओळख करून दिली. त्यावेळी नतमस्तक होऊन शेळके यांनी मोदी यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर हस्तांदोलन करत पंतप्रधानांनी शेळके यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी उपमुख्यमंत्री…

Read More

पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघटनेचा जाहीर पाठींबा- पैलवान ग्रुप आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारात

पिंपरी- (pragatbharat.com)आजपर्यंत आपण पैलवानांना मैदानात कुस्ती करताना पाहिले. पण, हेच पैलवान आत्ता भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी- आरपीआय व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार पैलवान महेश लांडगे यांच्याकरिता भोसरीचे मैदान मारण्यासाठी आखाड्यात उतरले आहेत. पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघटना, पैलवान ग्रुपने आमदार लांडगे यांना जाहीर पाठींबा दिला. हे पैलवान लांडगे यांचा प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. भोसरीचे मैदान पैलवान महेश लांडगे हेच मारणार, असा विश्वास पैलवानांनी व्यक्त केला. कुस्तीच्या आखाड्यात मैदान गाजवत असतानाच महेश लांडगे यांनी राजकारणात प्रवेश केला. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, एकदा अपक्ष आणि एकदा भाजपकडून असे दोनवेळा भोसरीचे…

Read More

विकासाची पालखी वाहणाऱ्या अण्णा बनसोडे यांना विजयी करा..

पिंपरी (pragatbharat.com) :- उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमी म्हणतात की ‘आम्ही विचाराचे वारकरी वाहतो विकासाची पालखी’ त्यामुळे विकासाची पालखी वाहण्यासाठी पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांना विजयी करावे असे आवाहन प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांनी केले .राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार अण्णा दादू बनसोडे यांची चिंचवड दत्तनगर, विद्यानगर, शंकरनगर, रामनगर भागाची प्रचार फेरी “प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम” यांच्या उपस्थितीत मंगळवारी काढण्यात आली. राम मंदिरापासून रॅली सुरू झाली राम मंदिर, पंचजन्य टाटा शो रूम, दत्त नगर, शंकर नगर, बाबर वजन काटा, विद्या नगर, परशुराम चौक नगर, राम…

Read More

कलाटेंसाठी शरद पवार चिंचवडमध्ये, वस्ताद काय करणार याकडे सर्वांचे लक्ष :वाल्हेकर वाडीतील शरद पवारांच्या सभेची उत्सुकता शिगेला !

वाकड, ता. १३ (pragatbharat.com): चिंचवड विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आघाडीव उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारार्थ  पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची गुरुवारी (ता १४) जाहीर सभा होत आहे. त्यामुळे, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला असून, विरोधकांना चितपट करण्यासाठी वस्ताद नेमका कुठला डाव टाकणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.        वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डन याठिकाणी सभेची सर्व तयारी करण्यात आली असून, दुपारी बारा वाजता शरद पवार चिंचवड वासियांना मार्गदर्शन करणार आहेत. उद्याच्या सभेसाठी चिंचवड मतदार संघातून हजारोच्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी बाईक रॅली काढून, मोठया संख्येने सभेच्या…

Read More

पिंपरी येथे मतदानासाठी मतदान यंत्रे तयार करणेचे काम सुरू

पिंपरी (अ.जा.)(pragatbharat.com) विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, त्याअनुषंगाने पिंपरी विधानसभा मतदार संघ कार्यालयाकडुन मतदानकेंद्र निहाय मतदान यंत्रे (EVM व  VVPAT) मतदानासाठी तयार करणेचे कामकाज आज दि. १३/११/२०२४ सुरूवात करणेत आले आहे. पिंपरी (अ.जा.) विधानसभा मतदारसंघासाठी ४७७ बॅलेट युनिट, ४७७ कंट्रोल युनिट आणि ५१७ व्हीव्हीपॅट मशीन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उपलब्ध झाले आहेत. पिंपरी (अ.जा.) विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण ३९८ मतदान केंद्रे आहेत. या मतदारसंघात १५ उमेदवार निवडणूकीसाठी रिंगणात असून त्यासाठी आवश्यक असणाऱ्या ३९८ मतदान केंद्रांसाठी प्रत्येकी १ बॅलेट युनिट, १ कंट्रोल युनिट व १ व्हीव्हीपॅट यंत्रे वाटप करण्यात आली असून ७९ बॅलेट युनिट, ७९ कंट्रोल युनिट…

Read More

भोसरी, पिंपरी , चिंचवडमधील महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी निवडणूक हातात घ्या- शरद पवार

भाजपच्या राजवटीत महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर  भोसरी 13 नोव्हेंबर; (pragatbharat.com) महाराष्ट्र राज्य हातामध्ये द्या ,तुम्हाला खात्री देतो महाराष्ट्राचा चेहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. महिलांचे संरक्षण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, युवकांच्या हाताला काम अशा अनेक गोष्टी करायच्या आहेत.त्यासाठी तुमची भूमिका महत्त्वाची आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार बुधवारी भोसरी येथील सभेत म्हणाले. एकेकाळी देशात महाराष्ट्र क्रमांक एकचे राज्य होते. आज प्रत्येक बाबतीत महाराष्ट्राची घसरण सुरू आहे. गेल्या आठ वर्षाच्या भाजपच्या राजवटीत दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर फेकले गेले आहे .महाराष्ट्राला गतवैभव मिळवून द्यायचे असेल तर राज्य महाविकास आघाडीच्या हातात द्या…

Read More