( प्रगत भारत । pragatbharat.com) Gyanvapi Masjid Case: वाराणसी कोर्टाने ज्ञानवापी मशीद परिसरात वैज्ञानिक सर्वेक्षण करण्यास परवानगी दिली आहे. वादग्रस्त जागा वगळता इतर ठिकाणी सर्वेक्षण करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याप्रकरणी 14 जुलै रोजी सर्वांचा युक्तिवाद पूर्ण झाला होता. यानंतर कोर्टाने आज निर्णय दिला आहे. त्यानुसार, कोर्टाने आज वैज्ञानिक सर्वेक्षण करण्यास परवानगी दिली आहे. कोर्टाने आज निर्णय देताना काशी विश्वनाथ मंदिराशेजारी असणाऱ्या ज्ञानव्यापी मशिदीच्या कार्बन डेटिंगला परवानगी दिली आहे. वादग्रस्त ‘शिवलिंग’ संरचना वगळता इतर परिसराचे वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याची परवानगी देण्यात आली आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) हा सर्व्हे करणार आहे. या खटल्यात हिंदूंच्या…
Read More