x ceo Elon Musk reacts to Chandrayaan 3 vs Interstellar budget

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan 3 Landing on moon : भारताकडून अवकाशात पाठवण्यात आलेल्या चांद्रयानानं अखेर निर्धारित टप्पा गाठला आणि संपूर्ण जगभरात या ऐतिहासिक क्षणाचा उत्साह पाहायला मिळाला. चंद्राचं दक्षिण ध्रुव गाठणारा भारत पहिला, तर चंद्रावर यशस्वीपणे यान उतरवणारा चौथा देश ठरला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञांनी अथक परिश्रमांनंतर प्रचंड जिद्द आणि चिकाटीनं ही मोहिम यशस्वी करून दाखवली. जगभरातून सध्या या मोहिमेशी संबंधित प्रत्येकावर, किंबहुना प्रत्येत भारतीयावरही कौतुकाचा वर्षाव होत आहे.  सोशल मीडिया म्हणू नका किंवा आणखी कोणतंही माध्यम. सर्वत्र चांद्रयान, विक्रम लँडर, प्रज्ञान रोवर, इस्रो हेच शब्द…

Read More