( प्रगत भारत । pragatbharat.com) Wrestlers Protest : गेल्या 36 दिवसांपासून भारतीय कुस्तीपटू सहकाऱ्यांवर झालेल्या लैंगिक छळाच्या तक्रारीच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. नव्या संसद भवनाच्या लोकार्पणाच्या दिवशीच दिल्ली पोलिसांकडून कुस्तीपटूंचे आंदोलन चिरडण्याचा देखील प्रयत्न झाला. अशातच आता भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष ब्रृजभूषण शरण सिंह (brij bhushan sharan singh) यांच्या विरोधात दाखल केलेल्या दोन्ही तक्रारी आता समोर आल्या आहेत. माध्यमांच्या वृत्तानुसार, ब्रृजभूषण सिंह आणि सचिव विनोद तोमर यात मुख्य आरोपी आहेत. एफआयआरनुसार, ब्रृजभूषण यांनी कुस्तीपटूंचा अनेकदा विनयभंग केल्याचा आरोप आहे. यामध्ये कुस्तीपटूंना अयोग्यरित्या स्पर्श केल्याचे देखील म्हटलं आहे. श्वास…
Read More