( प्रगत भारत । pragatbharat.com) South Africa vs Scotland : दक्षिण आफ्रिकेच्या अंडर-19 संघाचा सलामीवीर फलंदाज स्टीव्ह स्टोक (Steve Stolk) याने आयसीसी अंडर-19 विश्वचषक 2024 मध्ये ( U19 World Cup 2024) आपल्या स्फोटक फलंदाजीने इतिहास रचला आहे. स्टीव्ह स्टोकने स्कॉटलंडविरुद्ध अंडर 19 विश्वचषकातील सर्वात जलद अर्धशतक झळकावून खळबळ उडवून दिलीये. स्टीव्ह स्टोकने अवघ्या 13 चेंडूत आपलं अर्धशतक (Steve Stolk fastest fifty) पूर्ण केलं. 17 वर्षांच्या स्टीव्हने डावाच्या पहिल्या तीन षटकांत अर्धशतक पूर्ण केलं होतं. स्कॉटलंडने दिलेल्या 270 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला स्टीव्ह स्टोकने झंझावाती सुरुवात करून दिली.…
Read More