[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
अहमदाबाद: राजकोटमध्ये एका महिलेने पतीच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एकाच वेळी अनेक औषधांचं सेवन करुन या महिलेने मृत्यूला जवळ केलं. यापूर्वी महिलेने सुसाईड नोट लिहिण्याचा प्रयत्न केला. यानंतर नंतर व्हिडिओ रेकॉर्डिंगही केले. यामध्ये महिलेने तिच्या पतीचे पायल नावाच्या महिलेसोबत संबंध असल्याचं नमूद केलं आहे. यानंतर महिलेने आत्महत्या केली. महिलेच्या भावाच्या तक्रारीवरून पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजकोटच्या लक्ष्मी नगर भागात राहणाऱ्या अलका परमार नावाच्या विवाहित महिलेने एकाच वेळी अनेक औषधं प्राशन करून आपले जीवन संपवले. आत्महत्या करण्यापूर्वी विवाहितेने आपल्या मुलीचा सांभाळ करण्याची विनंती केली आणि त्यानंतर तिच्या पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे सांगितले. पत्नीने लिहिले की, पतीचे पायल नावाच्या महिलेसोबत संबंध होते. माझं कोणी काही ऐकत नाही. मी जगून काय करु, इतकं लिहून या महिलेने औषधं खाल्ली. महिलेने तिच्या व्हिडिओमध्ये पती आणि सासरच्या मंडळींवर छळ केल्याचा आरोपही केला आहे. तिचे हे दोन्ही व्हिडिओ फोनमध्ये सापडले आहेत.

राजकोटच्या मालवीय नगर पोलीस ठाण्यात भावाच्या तक्रारीवरून पती जैस्मिन परमार, सासरे रमेशभाई परमार, सासू सरोजबेन परमार आणि पतीची मैत्रीण पायल यांच्याविरुद्ध कलम ३०६, ४९८ (ए) आणि ११४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत महिला ३२ वर्षीय अलका परमारचा विवाह ११ वर्षांपूर्वी जैस्मिन परमारसोबत झाला होता. लग्नाच्या दोन वर्षांनी अलकाला मुलगी झाली. ती आता ९ वर्षांची आहे. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नयनभाई चौहान यांनी सांगितले आहे की, सुमारे एक वर्षापूर्वी माझ्या बहिणीच्या पोटात ट्यूमर असल्याने तिचं ऑपरेशन झालं होतं. त्यामुळे ऑपरेशन दरम्यान तिची पिशवी काढण्यात आली. यानंतर बहिणी सासरच्यांना मुलगा देऊ न शकल्याने तिच्यावर अत्याचार करण्यात येत होते.
[ad_2]