[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Pradip Kurulkar : पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवल्याचा आरोप असलेले DRDO चे संचालक प्रदीप कुरुलकर यांच्या विरोधात एटीएसने 2000 पानांचं दोषारोप पत्र पुण्यातील विशेष न्यायालयात दाखल केलं आहे. त्याचबरोबर कुरुलकरांची पॉलिग्राफ आणि व्हॉईस क्लीअर अॅंड सायकॉलॉजिकल टेस्ट करण्यास परवानगी देण्याची मागणीही एटीएसकडून न्यायालयात करण्यात आली आहे. या मागणीवर आता 7 जुलैला सुनावणी होणार आहे. झारा दासगुप्ता आणि कुरुलकर हे नग्न होऊन एकमेकांशी चॅटिंग करत होते आणि त्याचे फोटो कुरुलकरच्या लॅपटॉपमधे आढळून आले आहेत.
ATS च्या दोषारोपपत्रात काय आहे?
डीआरडीओचे संचालक असताना प्रदीप कुरुलकर हे झारा दासगुप्ता या महिलेशी मोबाईल वॉट्सअप आणि ईमेलच्या माध्यमातून संपर्कात होता. झारा दासगुप्ता या नावाने बनावट अकाऊंट पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणांकडून चालवण्यात येत होतं. कुरुलकरांनी झारा दासगुप्ताला भारताच्या क्षेपणास्त्र मोहिमेबद्दल संवेदनशील माहिती दिली. कुरुलकर भारताच्या डीआरडीओच्या वेगवेगळ्या लॅबोरेटरीजची माहिती देखील पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणाना देत होता. ज्या कालावधीत कुरुलकर झारा दासगुप्ताच्या संपर्कात होता त्याच कालावधीत तो सातवेळा विशेष पासपोर्टवर परदेशात जाऊन आला आहे. कुरुलकर झारा दास गुप्ताला संवेदनशील माहिती जशी देत होता त्याचबरोबर तिच्याशी अश्लील भाषेत चॅटिंग देखील करत होता. झारा दासगुप्ता आणि कुरुलकर हे नग्न होऊन एकमेकांशी चॅटिंग करत होते आणि त्याचे फोटो कुरुलकरच्या लॅपटॉपमधे आढळून आले आहेत. प्रदीप कुरुलकर यांनी डी आर डी ओची आणखी कोणती संवेदनशील माहिती पाकिस्तानला दिलीय याचा तपास ATS कडून सुरुच राहणार आहे.
अनेक महिलांना भेटत होते कुरुलकर…
DRDO च्या मुंबईतील सांताक्रुझ भागातील गेस्ट हाऊसमध्ये प्रदीप कुरुलकर हे सातत्यानं महिलांना भेटत असल्याचं समोर आलं होतं. यातील एकही महिला त्यांच्या नात्यातील किंवा DRDO मध्ये कर्मचारी नव्हती. ऑक्टोंबर 2022 ते फेब्रुवारी 2023 या कालावधीत कुरुलकर ज्यावेळी सांताक्रूझमधील गेस्ट हाऊसला राहिले त्यावेळचं सीसीटीव्ही तपासलं असता ही धक्कादायक माहिती समोर आली होती. कुरुलकर रात्रीच्या वेळी मुंबईच्या गेस्ट हाऊसमध्ये भेटलेल्या महिलांची संख्या एक – दोन नाही तर त्याहून अधिक आहे. या महिला त्यांच्या परिचयाच्या आहेत. त्या नातेवाईक किंवा DRDO मध्ये काम करत नाहीत. ज्या कालावधीत कुरुलकर झारा दासगुप्ता या पाकिस्तानी एजंटच्या संपर्कात होते त्याच कालावधीत झालेल्या या गेस्ट हाऊसमधील भेटी आहेत. त्यामुळं त्यांचा काही परस्पर संबंध आहे का? याचा एटीएस तपास करत आहेत.
हेही वाचा-
Dr. Pradip Kurulkar Spy Case : ना नातेवाईक, ना DRDO चे कर्मचारी; कुरुलकर नेमके गेस्ट हाऊसमध्ये कोणत्या महिलांना भेटायचे?
[ad_2]