[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Vasai Suncity Road: 13 दिवसांपासून गास, सनसिटी रस्ता पाण्याखाली; तरूणांचं पाण्यात बसून आंदोलन सलग तेरा दिवसापासून वसईतील गास – सनसिटी रस्ता हा पाण्याखाली गेला आहे. हा मुख्य रस्ता पाण्याखाली गेला असल्याने येथील स्थानिक गावातील तरुणांनी प्रशासनाच्या विरोधात आज आगळवेगळं आंदोलन केलं आहे. गास गावातील आम्ही गासकर या संघटनेच्या तरुणांनी गास सनसिटी रस्त्यावर पाण्यात बसून, ठिय्या आंदोलन केलं. आणि यावेळी प्रशासनाचा धिक्कार ही केला आहे. गास सनसिटी रस्त्याचा वापर नालासोपारा, भुईगाव, निर्मळ, गास, विरार पासून २५ ते ३० हजार नागरिक नियमित करत असतात. वसई रेल्वे स्थानक या रस्त्याने काही वेळातच गाठता येते. सनसिटी, चुळणे रस्त्यावर बाजूलाच लागून संपूर्ण खाडी क्षेत्र असल्याने खास करून पावसाळ्यात समुद्रात भरती आली की हे पाणी सुध्दा या गासच्या रस्त्यावर येते आणि इथला संपूर्ण मार्गच बंद होतो आणि दरवर्षीप्रमाणे पालिका आणि वाहतूक पोलीस हा रस्ता बंद करतात. येथील नागरिकांना वसई गाव अथवा देवतलाव असा दुहेरी वळसा घेत निर्मळ मार्गे नालासोपारा अथवा पुन्हा वसईत येण्यासाठी लांबपल्ल्याचा प्रवास करून शेवटी घर गाठावे लागत आहे. आजारी माणसे, कामावर जाणीरे चाकरमनी यांना हा रस्ता बंद असल्यामुळे मोठा ञास होत आहे. यावेळी तर १३ दिवस रस्ता बंद झाला आहे. आणि रस्त्याच चिञ बघता, आणखीन तीन ते चार दिवस लागू शकतो, ते ही पाउस पडला नाही तर त्यामुळे आज तरुणांनी आपल्या ञासाला पाण्यात बसून, प्रशासनाच्या निदर्शनास आणण्यास ठिय्या आंदोलनाच पाउल उचळलं आहे.
[ad_2]