[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींना पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध होत नाही, तोपर्यंत पीओपीच्या मूर्ती असाव्यात, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने बुधवारी मुंबई महापालिकेकडे केली आहे.
तर, गणेशमूर्तींच्या उंचीवरील मर्यादा काढून टाकण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. पालिकेने राज्य सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी समितीने केली आहे.
गणेशोत्सव मंडळांना येणाऱ्या अडचणी व त्याची संयुक्तिक कारणे राज्य सरकारसोबत झालेल्या बैठकीत मंडळांनी मांडले. पीओपीमधील घातक घटक बाजूला करून मूर्ती कशा तयार करता येतील, याबाबत शास्त्रज्ञांची समिती नियुक्ती केली जाईल. या समितीचा अहवाल येईपर्यंत व पीओपीला सक्षम पर्याय मिळत नाही, तोपर्यंत गतवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती पीओपीच्या राहतील.
तसेच, मूर्तींच्या उंचीची मर्यादाही काढून टाकावी, या मंडळांच्या मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत मान्यता दिली आहे. ही बाब लक्षात घेऊन पालिकेने त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे, अशी माहिती समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड नरेश दहिबावकर यांनी दिली.
[ad_2]