[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Amit Shah Pune Visit : देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे आज आणि उद्या (रविवार, 6 ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर येत आहे. त्यांच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी पुण्यातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. तसं नियोजनही पोलिसांकडून केलं जात आहे. उद्या (6 ऑगस्ट) केंद्रीय सहकार संस्थेने निर्माण केलेलं पोर्टल लॉंच करण्यासाठी ते पुण्यात येणार आहेत. पिंपरी चिंचवडमधील रामकृष्ण मोरे सभागृहात अमित शाहांचा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकार मंत्री उपस्थित राहणार आहेत.
जाणून घ्या वाहतुकीतल बदल
महावीर चौक : महावीर चौकाकडून चिंचवडगावाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे. त्यामुळे पर्यायी मार्गावरून ही वाहने महावीर चौकाकडून खंडोबा माळ चौक येथून इच्छित स्थळी जातील.
दर्शन हॉल लिंक रोड : लिंकरोडकडून अहिंसा चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात येतं आहे.
पर्यायी मार्ग: वाहने मोरया हॉस्पिटल चौकाकडून इच्छित स्थळी जातील.
रिव्हर व्ह्यू चौक: अहिंसा चौक बाजूकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आली असून ही वाहने या चौकाकडून वाल्हेकरवाडी, बिजलीनगरमार्गे इच्छित स्थळी जातील.
हा सर्व बदल रविवारी (उद्या, ता. 6) सकाळी आठ ते दुपारी तीन पर्यंत असणार आहे असेही (traffic) पोलिस आयुक्त काकासाहेब डोळे यांनी स्पष्ट केले.
मोदींनंतर अमित शाह येणार…
नुकतेचं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तीने पुण्यात येऊन गेले. त्यांनी यावेळी पुणे मेट्रोचं उद्घाटनही केलं त्यानंतर लगेच अमित शाह येणार असल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.मागील काही दिवसांपासून भाजप नेत्यांचं पुणे शहरावर जास्त लक्ष असल्याचं दिसत आहे. एकामागून एक भाजपचे मोठे नेते पुणे दौरा करताना दिसत आहे . पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराच्या पराभवानंतर पक्ष मजबूत करण्यासाठी पावले उचलत आहेत. पुणे जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदार संघाच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवर नेत्यांनीही पुणे शहराला महत्व दिले आहे. यामुळे 1 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर आता अमित शाह पुण्यात येत आहे.
या दोन दिवसांच्या दौऱ्यात त्यांनी बराच वेळ राखीव ठेवला आहे. त्यात ते कदाचित पुण्यात वेगवेगळ्या लोकांशी संपर्क साधण्याची किंवा भाजप नेत्यांशीदेखील संवाद साधण्याची शक्यता आहे. पुणे पोटनिवडणुकीचा पराभवानंतर भाजपने पुण्याकडे चांगलच लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यामुळे अनेक नेते पुणे दोऱ्यावर येताना दिसतात.
हेही वाचा-
Pawar Vs Pawar : शरद पवार गटातील मोठा नेता अजित पवार गटात जाणार, आगामी मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता : सूत्र
[ad_2]