Beed News Beed Municipal Council Vandalized Mns Demand To Fill Potholes

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

बीड : मागील काही दिवसांत बीड (Beed) शहरात मोठ्या प्रमाणात खड्डे झाल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी बीड शहरातील मुख्य रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामध्ये मनसेच्या (MNS) वतीने रांगोळी काढून रस्ता दुरुस्तीसाठी गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले होते. तसेच, याचवेळी रस्त्याच्या दुरुस्ती न झाल्यास नगरपरिषदेमध्ये तोडफोड करु असा इशारा देण्यात आला होता. मात्र, संबंधित प्रशासनाकडून कोणतेही हालचाली झाली नसल्याने आज मनसे कार्यकर्त्यांनी नगरपरिषद कार्यालयात तोडफोड केल्याचे पाहायला मिळाले आहे. 

बीड शहरातील मोंढा आणि एमआयडीसी भागात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अनकेदा मागणी करुनही या रस्त्याची दुरुस्ती होत नव्हती. तर या खड्यामुळे रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढल आहे. मनसेकडून देखील अनेकदा या रस्त्याच्या कामासाठी निवदेन देण्यात आले. मोंढा आणि एमआयडीसी भागात जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली आहे. त्यामुळे नागरिकांना आणि शाळकरी मुलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे रस्ता दुरुस्तीसाठी मनसेच्या वतीने रांगोळी काढून आंदोलन करण्यात आले होते. मात्र, तरीही प्रशासन दखल घेत नसल्याने आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी बीडच्या नगरपरिषद कार्यालयाची तोडफोड केली आहे. 

अमरधाम स्मशानभूमी ते जालना रोडला जोडणारा रस्ता हा मोठया बाजार पेठेला जोडणारा प्रमुख रस्ता असून, शहरातील नागरिकांनी शाळकरी मुलं देखील या रस्त्याचा वापर करतात. मात्र काही दिवसापासून या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढल आहे. हे प्रशासनाला अनेक वेळा सांगून सुद्धा प्रशासन काहीच करत नसल्याचे सांगत आज मनसे कार्यकर्त्यांनी बीड नगरपरिषद कार्यालयात तोडफोड केली. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Beed News : बीड शहरात खड्डेच-खड्डे, मनसेकडून रांगोळी काढून हटके आंदोलन

[ad_2]

Related posts