Trainee flight attendant found dead in flat under suspicious circumstances, police probe underway

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबईतील (Mumabi) पवई (Powai) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका इमारतीमध्ये एका मुलीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Mumbai Police) घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरु केला आहे. दरम्यान, फ्लॅटमध्ये तरुणीचा मृतदेह सापड्याने इमारतीमधील रहिवाशांना धक्का बसला आहे.

एनजी हाऊसिंग सोसायटीमध्ये 25 वर्षीय तरुणीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांच्या पथकाने मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, हत्येचा गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपींना पकडण्यासाठी चार पथके तयार करण्यात आली आहेत.

मृत तरुणी एअर होस्टेस असल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे. तरुणी कोण आहे? ती फ्लॅटमध्ये कधीपासून एकटीच राहत होती? तिच्या हत्येमागचे कारण काय? याबाबत पोलीस प्रत्येकाकडे तपास करत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

रूपल ओगरे (वय 23, रायपूर, छत्तीसगड) असं या एअर होस्टेसचं नाव आहे. रुपल ही पवईतल्या एनजी कॉम्प्लेक्स इथे तिची बहिण आणि मित्रासोबत राहायला होती. हत्येची घटना घडली तेव्हा रुपल घरी एकटीच होती. तिची बहिण आणि मित्र हे दोघेही आपल्या गावी गेले होते.  

मुंबई पोलिसांचे डीसीपी दत्ता नलावडे यांनी सांगितले की, पवई पोलिसांच्या हद्दीतील एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये एका मुलीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला आहे, आम्ही प्रत्येक बाबींचा तपास करत आहोत. मृत तरुणी एअर होस्टेस होती, तिची नुकतीच एअर होस्टेस म्हणून निवड झाली होती.


हेही वाचा

[ad_2]

Related posts