[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Beed Crime News: ढोलकीच्या वादातून बीडच्या (Beed Crime News) गेवराई तालुक्यातील (Gevrai Taluka) इरगावमध्ये दोघाजणांमध्ये वाद झाला होता. याप्रकरणी आरोपींना दोषी ठरवून तब्बल आठ जणांना जन्मठेपेची शिक्षा (Life Sentence) सुनावण्यात आली आहे. ढोलकीच्या वादातून वाद निर्माण झाला होता आणि वादाचं रुपांतर हाणामारीत झालं होतं. या हाणामारीमध्ये एकाचा मृत्यू झाला होता. याचप्रकरणी आठही जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
गेवराई तालुक्यातील इरगाव येथील तुकाराम माळी आणि धर्मराज माळी यांच्यात आराधी गीत म्हणण्यासाठी सामूहिक ढोलकी होती. ही ढोलकी नवरात्रीचे गाणे म्हणण्यासाठी तुकाराम यांनी धर्मराजच्या घरून आणली. त्यानंतर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास धर्मराज यानं तुकारामाच्या घरी जाऊन ढोलकी का आणली? म्हणून त्याला मारहाण केली. दुसऱ्या दिवशी पुन्हा तुकारामाच्या घरी जाऊन लाकूड, काठ्या आणि लाथा बुक्यानं मारहाण केली. यामध्ये तुकाराम गंभीर जखमी झाला. त्याला औरंगाबाद येथे उपचारासाठी घेऊन जात असताना त्याचा मृत्यू झाला होता.
या प्रकरणी मारहाण करणाऱ्या धर्मराज माळी, यांच्यासह सात जनावर गेवराई पोलिंसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2014 साली घडलेल्या या प्रकरणात गेवराई न्यायालयात खटला चालला. त्यानंतर अंतिम सुनावणीसाठी हे प्रकरण अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश यांच्याकडे वर्ग करण्यात आलं होतं. सरकारी पक्षाच्या वतीनं 13 साक्षीदार तपासण्यात आले, तर या प्रकरणात न्यायालयाकडून आठ आरोपींना जन्मठेप आणि प्रत्येकी दहा हजार दंड ठोठावण्यात आला आहे.
[ad_2]