( प्रगत भारत । pragatbharat.com)
Mangal Gochar 2023: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनुसार, आपल्या राशीमध्ये बदल करतो. यावेळी त्याचा सर्व राशींच्या व्यक्तींवर परिणाम होताना दिसतो. यावेळी काहींवर शुभ तर काहींवर अशुभ परिणाम होतो. 3 ऑक्टोबरला मंगळ तूळ राशीत प्रवेश केला आहे. यावेळी ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळाचे हे संक्रमण सर्व राशींच्या जीवनावर परिणाम करणार आहे. परंतु काही राशीच्या लोकांसाठी मंगळाचे गोचर हे अशुभ सिद्ध होणार आहे.
मंगळवारी 3 ऑक्टोबर 2023 रोजी संध्याकाळी 05:58 वाजता मंगळाने कन्या राशीतून शुक्राच्या राशीत तूळ राशीत प्रवेश केला आहे. मंगळ या राशीत 43 दिवस राहणार आहे. 16 नोव्हेंबर 2023 रोजी तूळ राशीतून निघून वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. दरम्यान पुढील 43 दिवस तूळ राशीत राहणार असून यादरम्यान तो स्वाती आणि विशाखा नक्षत्रातही प्रवेश करेल.
ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळाचे तूळ राशीत प्रवेश होताच काही राशीच्या लोकांच्या अडचणी वाढणार आहेत. त्यामुळे या काळात राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
वृषभ रास (Taurus)
मंगळाचे तूळ राशीत संक्रमण होताच वृषभ राशीच्या लोकांनी थोडं सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. या काळात तुमच्या आर्थिक अडचणी वाढू शकतात. यावेळी तुम्हााला अत्यंत हुशारीने वागावं लागणार आहे. लहान मुलांशी संबंधित काही अशुभ बातम्याही तुम्हाला ऐकायला मिळतील. कुटुंबातही वाद होऊ शकतात.
कर्क रास (Cancer)
कर्क राशीच्या लोकांसाठी मंगळाचं गोचर फार शुभ ठरणार असं म्हणता येणार नाही. या काळात तुम्हाला करिअर आणि व्यवसाय क्षेत्रात आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे. पैशांच्या गुंतवणुकीबाबत कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. कामाच्या ठिकाणी वाद होतील. वैवाहिक जीवनातही मतभेद आणि वाद होतील.
कुंभ रास (Aquarius)
कुंभ राशीच्या लोकांसाठी मंगळाच्या राशीतील बदल नकारात्मक ठरू शकतात. या काळात तुम्हाला मानसिक अस्वस्थता जाणवेल आणि कुटुंब, जवळचे नातेवाईक आणि मित्रांशी भांडण होऊ शकतं. कामाच्या ठिकाणीही तुम्ही नाराज व्हाल. यावेळी तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवण्याची विशेष गरज आहे. घरात भांडणं होऊ शकतात.
धनु रास (Sagittarius)
मंगळाचा तूळ राशीत प्रवेश होताच धनु राशीच्या लोकांच्या अडचणीही वाढणार आहेत. या काळात तुम्हाला कौटुंबिक वाद, कामातील आव्हानं, आर्थिक समस्या आणि मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. पैशांच्या बाबतीत तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागणार आहे.
( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )