Work Strike By Lawyers In Aurangabad Bench Bombay High Court Chhatrapati Sambhaji Nagar News Updates

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Work Strike By Lawyers in Aurangabad Bench: छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहरातील मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) औरंगाबाद खंडपीठातील (Aurangabad Bench) वकिलांनी कामबंद आंदोलनाची हाक दिली आहे. खंडपीठातील नव्या आणि जुन्या इमारतीमधील कामावरून हे आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. न्यायालयाचे काही कामकाज जुन्या इमारतीमध्ये तर काही कामकाज नवीन इमारतीमध्ये सुरू आहे. त्यामुळे हे सर्व कामकाज एकाच ठिकाणी करण्याची मागणी वकील संघाने केली होती. मात्र, मागणी पूर्ण होत नसल्याने आजपासून वकील संघाकडून कामकाज बंदची हाक देण्यात आली आहे.

वकील संघाच्या मागणीनुसार, सध्या चालू असलेल्या जुन्या इमारतीमध्ये फौजदारी व दिवाणी न्यायालयाचे कामकाज सध्याच्या जुन्या न्यायालयीन कक्षांमध्ये चालू ठेवण्यात यावेत. तसेच  नव्या इमारतीमध्ये फौजदारी व दिवाणी न्यायालय रजिस्ट्रीचे कामकाज व सर्व ऑफिसेस स्थलांतरित करून दोन्ही इमारतीचे कामकाज चालू ठेवावे. मात्र, मागणी पूर्ण होत नसल्याने वकिलांनी काम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

…तर दिवाणी आणि फौजदारी कामकाजात  सहभागी न होण्याचा वकिलांचा निर्णय

फौजदारी न्यायालये 3 ऑक्टोबरपर्यंत जुन्या इमारतीमध्ये सुरू न झाल्यास 4 ऑक्टोबरपासून खंडपीठातील दिवाणी आणि फौजदारी कामकाजात वकिलांनी सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. वकिलांच्या ठरावाची प्रशासनाने दखल घेतली नसल्यामुळे आजपासून वकिलांनी खंडपीठातील दिवाणी व फौजदारी कामकाजात सहभागी होऊ नये, असे आवाहन वकील संघाचे अध्यक्ष अॅड. नरसिंह एल. जाधव आणि सचिव अॅड. राधाकृष्ण के. इंगोले यांनी केले आहे.

[ad_2]

Related posts