Baramati Accident News After Being Discharged,the Youth Died In An Accident And The Mother Was Seriously Injured Pune Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

 पुणे : जन्म आणि मृत्यू कोणाच्याच हातात नसतो. बारामती (Baramati Accident News)  शहरातील बारामती हॉस्पिटल येथून डिस्चार्ज घेऊन घरी परतत असताना हायवाने दिलेल्या धडकेत एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. तर त्याची आई गंभीर   रुग्णालयात त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. रुग्णालयातून डिस्चर्ज घेऊन असताना आईच्या डोळ्यासमोर  मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.  

 बारामती शहरातील (Baramati News)  बारामती हॉस्पिटल येथून डिस्चार्ज घेऊन घरी परतत असताना हायवाने दिलेल्या धडकेत एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. तर त्याची आई गंभीर जखमी असून रुग्णालयात त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 7 ऑक्टोबरला  प्रशासकीय भवनासमोरील रिंगरोडवर भरधाव वेगाने धावणाऱ्या दहाचाकी हायवा गाडीने दुचाकीवरून जाणाऱ्या माय लेकाला जोरदार धडक दिली. या धडकेत 21 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

बीटेकच्या शेवटच्या वर्षाला 

तेजस विजय कासवे असे अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असून त्याची आई राधिका कासवे या गंभीर जखमी झाल्या आहेत. तेजस हा अपघात होण्याच्या दोन दिवसांपूर्वीच आपल्या नाकाच्या शस्त्रक्रियेसाठी बारामती हॉस्पिटल येथे भरती झाला होता. त्याच्या नाकावर शत्रक्रिया झाल्यावर आवश्यक ते उपचार करून तेजस रुग्णालयातून आईसह आपल्या दुचाकीवरून घरी जाण्यासाठी निघाला असताना भरधाव वेगात आलेल्या हायवाने त्यांना जोरदार धडक दिल्यावर तेजसचा जागीच मृत्यू झाला. तेजस सहा वर्षाचा असताना वडिलांचे छत्र हरपले आईने दोन भावांना खडतर परिस्थितीत दोघांचा सांभाळ केला. तेजस हा पुण्यातील व्हीआयआयटी बीटेकच्या (B. Tech) अंतिम वर्षात शिकत होता. 

अपघातानंतर चालक पळून गेला

या प्रकरणी बारामती शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. अपघात झाल्यानंतर हायवाचा चालक पळून गेला. बारामती पोलिसांनी अज्ञात चालकाविरोधात  गुन्हा दाखल केला असून पोलिस पुढील तपास करत आहे.  गेल्या अनेक दिवसांपासून स सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. अनेकदा स्पीड आणि रस्ते खराब असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे यापूर्वीही चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याच्या  घटना समोर आलेल्या आहेत. खादा अनुचित प्रकार झाल्यास मोठ्या जीवितहानीला सामोरे जावे लागते. 

हे ही वाचा :

Accident : दोन वाहनांचा अर्जंट ब्रेक, दुचाकीवरील महिलेला मिक्सर डंपरने चिरडले; मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घटना

 

 

[ad_2]

Related posts