How MS Dhoni Reintegrate Ravindra Jadeja To Stay With Chennai Super Kings Team in IPL; फक्त आणि फक्त धोनीमुळे सर जडेजा CSK मध्ये, अन्यथा त्या भांडणानंतर तर तो… वाचा Inside Story

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

चेन्नई: सोमवारी जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमयवरील चेन्नई सुपर किंग्जचा थरारक विजय अजूनही सर्वांच्या मनात असाच आहे. त्या विजयासोबतच धोनी आणि जडेजामधील तो प्रसंग तर कायमचं सगळ्यांच्या लक्षात राहणार असेल. जडेजा तो विजयी चौकार आणि खुद्द धोनीने त्याला उचलून घेतल्यानंतर त्याचा अश्रूंचा बांध फुटलेला व्हिडीओ सगळ्यांसाठीच अद्वितीय अनुभवाचा होता. CSK च्या मोहिमेचा हा एक सुंदर शेवट दिसत होता आणि इथेही धोनीने सर्वांचे मन जिंकले. त्याने सामन्याचा हिरो ठरलेला जडेजा आणि निवृत्ती जाहीर केलेला अंबाती रायडूला ट्रॉफी स्वीकारण्यासाठी मंचावर बोलावले. हे पाहून सर्वच नक्की म्हणाले असतील, ‘एकही तो दिल है माही कितनी बार जितोगे’.धोनी आणि जडेजाने भारतासाठी अनेक सामने जिंकले. ही जोडी आश्चर्यकारक होती, परंतु न्यूझीलंड विरुद्ध २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दोघांनाही बाद झाल्यानंतरची वेदना त्यांच्या डोळ्यात आयुष्यभर अश्रू आणणारी असेल. एकमेकांबद्दल प्रचंड व्यावसायिक आदर असूनही त्यांची केमिस्ट्री नेहमीच सहजतापूर्ण राहिली नाही. गेल्या वर्षी जेव्हा जडेजाला कर्णधार बनवण्यात आले आणि नंतर वगळण्यात आले तेव्हा जडेजाने सीएसके कॅम्प सोडला होता.

जडेजाने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून चेन्नई सुपर किंग्जशी संबंधित सर्व पोस्ट डिलीट केल्या होत्या. एक काळ असा होता की फ्रँचायझी आणि खेळाडू यांच्यातील सर्व संवादही बंद झाला होता. त्याला फ्रेंचायझी सोडायची होती, पण धोनीनेच हे प्रकरण हाताळले. तो म्हणाला की जडेजाला CSK सोडण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. त्याने डावखुऱ्या फलंदाजाला आपल्यासोबत कायम राहण्यास मनवले होते.
या मोसमात मात्र या अष्टपैलू खेळाडूला फलंदाजीचे पराक्रम दाखवण्याची संधी मिळाली नाही. जडेजा आऊट होण्याचा आनंद साजरा करणार्‍या चाहत्यांनी आणि त्याबद्दलच्या विधानांमुळे त्यांच्यात कटुता असलेल्या बातम्यांना उधाण आले. जड्डूचे ट्विट व्हायरल होऊ लागले. मग मैदानावरील मतभेद आणि गैरसमजांनी चाहत्यांनाही बुचकळ्यात पाडले होते. जेतेपद पटकावल्यानंतर जडेजाने धोनीसाठी जे लिहिले ते सगळ्यांनाच प्रभावित करणारे होते.

अंबानींनी अख्खी पर्स रिकामी केली, पोलार्डची कसर भरुन काढली आणि चेन्नईलाही जशास तसं उत्तर दिलं

धोनी-जडेजा जोडीनेच सोमवारी फॉर्मात असलेल्या शुभमन गिलला बाद केले. त्यानंतर नाट्यमय शैलीत जडेजाच्या बॅटने शेवटच्या षटकात धावा काढल्या आणि CSK चॅम्पियन झाला. सामन्यानंतर जडेजा म्हणाला, ‘मला हा विजय आमच्या एकमेव महेंद्रसिंग धोनीला समर्पित करायचा आहे.’ तो एक भावनिक क्षण होता. जडेजाला हे देखील ठाऊक आहे की धोनी काही वेळा त्याच्याशी कठोर वागत असला तरीही कर्णधाराचा त्याच्यावर प्रचंड विश्वास आहे.

धोनी पुढच्या सीझनमध्ये खेळेल याबाबत नेमके सांगत येत नाही, कारण त्याला गुडघ्याची दुखापत तर आहेच. अशा स्थितीत सीएसकेचा भावी कर्णधार म्हणून ऋतुराज गायकवाडची निवड करण्यात आली आहे, पण पुढच्या सत्रात जडेजाला कर्णधार म्हणून दुसरी संधी दिल्यास आश्चर्य वाटणार नाही. यावेळी त्याने जे केले त्यामुळे त्याच्याबद्दलचा आदर आणखीनच वाढला आहे.

[ad_2]

Related posts