Doctors Failed To Spot Blood Clot In Girl Leg She Died After 9 Days; पायावरील लाल-निळ्या खुणांकडे दुर्लक्ष, ९ दिवसात मुलीचा मृत्यू

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

एडिनबरा: अनेक वेळा आपल्याला असे अनेक गंभीर आजार पाहायला मिळतात ज्याची लक्षणं अगदी सामान्य असतात पण त्यामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो. यापैकीच एक म्हणजे शरीरावर दिसणाऱ्या काळ्या किंवा निळ्या रंगाच्या खुणा. कधी काही लागलं की त्याठिकाणी रक्त गोठतं आणि निळा-काळ्या रंगाच्या खुणा दिसतात. आपण याला अत्यंत सामान्य मानतो आणि दुर्लक्ष करतो. जर दुखत असेल तर ते पेनकिलर घेतो. पण, हा निष्काळजीपणा किती भारी पडू शकतो याची आपल्याला कल्पनाही नाही. एका मुलीच्या पायावर अशीच एक विचित्र खूण दिसली. डॉक्टरांना दाखवले असता त्यांनाही काही समजू शकले नाही. ही सामान्य दुखापत असल्याचं मानून डॉक्टरांनी तिला पेनकिलर देऊन घरी पाठवलं. मात्र, त्याच्या ९ दिवसांनी अचानक या मुलीचा मृत्यू झाला.

ज्याप्रकारे आपल्या मुलीचा मृत्यू झाला, तशी घटना कोणाच्याही बाबतीत घडू नये, यासाठी मुलीचे पालक आता लोकांना या आजाराबाबत जागरूक करण्यासाठी मोहीम राबवत आहेत. या मुलीची आई जेनने सांगितले की, माझी मुलगी केटी ही क्वीन मार्गारेट विद्यापीठात शिकत होती. एक दिवस अचानक तिच्या पायावर निळ्या रंगाची खूण दिसली. केटीला वाटलं की तिला कुठला किडा चावला असावा. पण, हळूहळू वेदना वाढत गेली. त्यामुळे त्यांनी तिला डॉक्टरांकडे नेले. रुग्णालयातील २ डॉक्टरांनी तिची तपासणी केली. पण, त्यांनाही काही समजू शकले नाही आणि अखेर माझ्या मुलीला जीव गमवावा लागला.

२ वर्षांची मैत्री, मग भरवस्तीत साक्षीचा खून; AC मॅकेनिक कसा बनला खुनी? साहिलची पूर्ण कहाणी
जेनने सांगितले की त्यांच्या मुलीला डीव्हीटी (Deep Vein Thrombosis) नावाचा आजार आहे. यामध्ये शरीरांमध्ये रक्ताच्या गुठळ्या जमा होतात. सहसा हे पायांमध्ये होते आणि यामुळे तीव्र वेदना, सूज येथे आणि जिथे रक्ताची गुठळी झालीये तिथल्या त्वचेचं तापमानवाढू शकते. काहीवेळा हे दोन्ही पायांमध्ये होऊ शकते. हे सहसा पोटरी किंवा मांडीत दिसते. काही काळानंतर, वेदना होत असलेली त्वचा लाल आणि नंतर काळी होऊ लागते. नसा कडक होतात. आणि त्यांना स्पर्श केला तर असह्य वेदना होतात. हे विषासारखे असते आणि मग व्यक्तीचा मृत्यू होतो.

१५ वर्षीय चिमुकल्याच्या हत्येचा बनाव रचला, रागाच्या भरात ओढणीने मृतदेह झाडाला टांगला!

डॉक्टरांनाही या आजाराची माहिती नव्हती, याचे केटीच्या पालकांना खूप दुःख आहे. तेव्हापासून ते लोकांना याबाबत जागरुक करत आहेत. त्यांच्या अपीलनंतर स्कॉटिश सरकारने एक समिती स्थापन केली आहे जी त्याची सखोल चौकशी करत आहे. हे जगभर घडत आहे, असे ते म्हणाले. केटीचे वडील गॉर्डन यांना गेल्या वर्षी इंटरनॅशनल सोसायटी ऑन थ्रोम्बोसिस अँड हेमोस्टॅसिस (ISTH) ने यासाठी राजदूत म्हणून नियुक्त केले होते. ही संस्था रक्त गोठणे आणि त्याचे विकार यावर संशोधन करते.

नोटांमध्ये सापडलेल्या चिठ्ठीतून शिवशाही चालकाच्या मृत्यूचं गूढ उकललं, धक्कादायक कारण पुढे

[ad_2]

Related posts