[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज माढा तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यावर ऊसाची मोळी पुजनाचा कार्यक्रम अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी अजित पवार यांची सभा झाली. दरम्यान, अजित पवार बोलताना प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका आंदोलकाने काळा झेंडा दाखवत अजित पवार यांचा निषेध केला. मराठा आरक्षण दिल्याशिवाय कसे दौरे करता? असा संतप्त सवाल या आंदोलकाने केला आहे. सोमा गायकवाड असे या आंदोलकाचे नाव आहे. दरम्यान, पोलिसांनी या आंदोलकाला ताब्यात घेतलं आहे.
मराठा आंदोलनाच्या मुद्यावरुन दिवसेंदिवस राजकारण तापत चाललं आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ठिकठिकाणी आंदोलन केली जात आहेत. नेत्यांना गावबंदी, तालुकाबंदी केली जात आहे. अशातच अजित पवार यांच्या माढा दौऱ्यालाही मराठा संघटनांनी विरोध केला आहे.
शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी 8 हजार कोटी सरकारने भरले
सत्तेत असताना काय केले ते विरोधात गेल्यावर कसे विसरता ? असे म्हणत खासगी नोकरभरतीच्या मुद्द्यावरुन अजित पवारांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी 8 हजार कोटी सरकारने भरले आणि नुकसान भरपाई 54 हजार कोटी मिळेल असे पवार म्हणाले. सत्तेवर नसणाऱ्यांकडून बदनामी करायचा प्रयत्न सुरु आहेत. आम्ही आमच्या जिल्ह्यात चांगल्या संस्था चालवून दाखविल्या आहेत.
नाशिक येथील सह्याद्री फार्म पाहिला, माळावर नंदनवन केले आहे. शालेय पोषण आहारात बेदाण्यासाठी लवकरच बैठक बोलावणार असल्याचे अजित पवार म्हणाले.
[ad_2]