[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
मुंबई : ठाकरे गटाच्या (Thackeray Group) कार्यकारिणीनंतर आता युवासेनेच्या (YuvaSena) कार्यकारिणीचा विस्तार होणार आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी हा विस्तार करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता युवासनेच्या कार्यकारिणीत कुणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तसेच या कार्यकारिणीमध्ये आमदार खासदारांच्या मुलांना संधी मिळणार की सर्वसामान्य कार्यकर्त्याचा नंबर लागणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आला होता. या कार्यकारिणीमध्ये 6 नवे नेते नियुक्त करण्यात आलेत.
वरुण सरदेसाई, सुप्रदा फातर्फेकर आणि साईनाथ दुर्गे या तिघांना ठाकरे गटाचं सचिव पद दिल्यानं युवासनेतून नाराजी सूर उमटत असल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर काही युवासेनेच्या कार्यकर्त्यांना ठाकरे गटात उपनेते पदही देण्यात आलं. पण तरीही अनेकांनी आदित्य ठाकरेंकडे नाराजी व्यक्त केली होती. सध्या ठाकरे गटासोबत युवासेनेलाही गळती लागल्याचं चित्र आहे. त्यातच आता आदित्य ठाकरे युवासनेचा विस्तार करणार असल्याने अनेकांचं लक्ष या विस्ताराकडे लागून राहिलं आहे.
युवासनेचे सध्याची कार्यकारिणी
युवासेनेच्या प्रमुख पदाची जबाबदारी ही स्वत: आदित्य ठाकरेंकडे आहे. तर युवासनेत एकूण 54 पदाधिकारी आहेत. तसेच विभागीय सचिव म्हणून 6 पदाधिकारी कार्यरत आहेत. तर युवासनेचं सचिव पद सध्या रिक्त आहे. कार्यकारिणीमध्ये एकूण 17 पदाधिकारी आहेत. तसेच विस्तारक कार्यकारिणीमध्ये एकूण 72 पदाधिकारी असतील.
ठाकरे गटाच्या कार्यकारिणीचा विस्तार
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना कार्यकारिणीचा विस्तार केला. या विस्तारात सहा नवे नेते तसेच उपनेते आणि संघटकपदी नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्यातील पक्षवाढीस बळकटी मिळावी यासाठी नव्या नियुक्त्या करण्यात आल्याचं शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.
ठाकरे गटाची कार्यकारिणी
खासदार विनायक राऊत, खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र वायकर, आमदार सुनील प्रभू यांची नेतेपदी नियुक्ती करून शिवसेना नेते मंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. तर उपनेते म्हणून विजय साळवी (कल्याण), संजय जाधव परभणी, संजय पवार (कोल्हापूर), राजुल पटेल (मुंबई), शीतल देवरू (मुंबई), शरद कोळी (सोलापूर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या नेतेमंडळीमध्ये एकूण 16 जणांचा समावेश असेल यामध्ये मनोहर जोशी, लीलाधर डाके, दिवाकर रावते, सुभाष देसाई, आदित्य ठाकरे, संजय राऊत, चंद्रकांत खैरे, अनंत गीते, अरविंद सावंत भास्कर जाधव, विनायक राऊत, अनिल देसाई, अनिल परब, राजन विचारे, रवींद्र वायकर, सुनील प्रभू यांचा समावेश असेल, असंही ठाकरे गटाकडून सांगण्यात आलं आहे.
हेही वाचा :
Shiv Sena Expands Executive Committee: शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकारिणीचा विस्तार; 6 नवे नेते नियुक्त
[ad_2]