( प्रगत भारत । pragatbharat.com)
Kojagiri Purnima 2023 : शरदाचे चांदणे,
आणि कोजागिरीची रात्र..
चंद्राच्या मंद प्रकाशात,
जागरण करू एकत्र..
दूध साखरेचा गोडवा
महाराष्ट्रासह देशभरातच कोजागिरी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात येते. या दिवशी महाराष्ट्रात रात्री घोटलेले दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवलं जातं आणि मध्यरात्री 12 वाजता प्राशन केलं जातं. पण आज कोजागिरी पौर्णिमेवर चंद्रग्रहणाची सावली पडली असल्याने लोकांमध्ये संभ्रम आहे की, चंद्रग्रहणामुळे आकाशाखाली दूध घेता येईल? (Kojagiri Poornima will be celebrated in 4 auspicious yoga Can milk be taken under the sky due to lunar eclipse and Kojagiri Purnima Milk Recipe)
कारण या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. याशिवाय ऑस्ट्रेलिया, पूर्व अमेरिका, बेल्जियम, थायलंड, पोर्तुगाल, हंगेरी, इजिप्त, इंग्लंड, जपान, चीनमध्येही ते दिसणार आहे. भारतात चंद्रग्रहण आज मध्यरात्री 1.05 वाजेपासून 02:23 वाजेपर्यंत आहे. तर दुपारी 4:05 वाजता ग्रहणाचे सुतक सुरु झालं आहे.
ग्रहण काळात दूध ठेवता येईल की नाही?
ज्योतिषाने सांगितलं की, तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेला काळजी घ्यावी लागणार आहे. चंद्रग्रहण होईपर्यंत दूध बनवण्यास मनाई असणार आहे. अशा स्थितीत मसाला दूध बनवण्यासाठी गाईच्या दुधात कुशा मिसळून ठेवा. या उपायाने सुतक काळात दूध शुद्ध राहतं. नंतर तुम्ही खीर बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकाल.
रात्री खुल्या आकाशाखाली दूध का ठेवतात?
पौराणिक मान्यता आहे की, खीरमध्ये अमृत असून त्यातून आरोग्य आणि आनंद प्राप्त होतो. त्यामुळे आरोग्य, धनप्राप्तीसाठी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दूध रात्री खुल्या आकाशाखाली ठेवण्याची परंपरा आहे. त्याशिवाय आर्थिक संपत्तीसाठी कोजागिरी पौर्णिमेला रात्री जागरण केला जातो. म्हणून या रात्रीला सह-जागरणाची रात्र म्हणजेच कोजागर असं म्हटलं जातं. को-जागृती आणि कोजागरा म्हणजे कोण जागृत आहे, असा शास्त्रात अर्थ सांगितला गेला आहे.
दुधात का पाहावं चंद्राचं प्रतिबिंब ?
कोजागिरी पौर्णिमेला चंद्र मध्यावर आल्यानंतर त्याचं प्रतिबिंब आटवलेल्या दुधात पाहतात आणि नंतर तो प्रसाद मानून प्राशन केलं जातं. असं म्हणतात वर्षभरात चंद्र शरद पौर्णिमेच्या दिवशी 16 कलागुणांनी प्रतिबिंबित होत असतात. असं म्हणतात त्याची या रात्री बाहेर पडणारी किरणे अमृततुल्य असतात.
ती किरणे पडलेलं दूध अमृततुल्य होऊन अमृतप्राशनाचं भक्तांना फळ मिळतं असं मान्यता आहे. अनेक प्रकारच्या व्याधी नष्ट करण्याचं सामर्थ्य त्या दुधात उत्पन्न होतं, म्हणून दूध प्राशन करण्याची भावना आहे.
चंद्रग्रहणामुळे पिता येणार दुधाचा प्रसाद?
कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री शरदाचं चांदणं अनुभवता येणार आहे. शिवाय आज रात्री चंद्राला आटवलेल्या दुधाचा नैवेद्य दाखवता येईल. मात्र रात्री चंद्रग्रहण असल्याने या दुधाचा प्रसाद सेवन करता येणार नाही. पंचांगकर्ते शरद उपायध्ये हे म्हणतात की, चंद्रग्रहणाचा वैयक्तिक कोणालाही त्रासदायक नाही. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत आणि प्रतलात आले की चंद्रग्रहण होते. पृथ्वीपेक्षा सूर्याचा आकार बराच मोठा असल्याने पृथ्वीची गडद गोलाकार छाया अस्तित्वातअसते. त्या छायेतून चंद्र जातो ते चंद्रग्रहण.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)