( प्रगत भारत । pragatbharat.com)
Delhi Accident : दिल्ली-जयपूर महामार्गावर (Delhi Jaipur highway) शुक्रवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला. दिल्ली-जयपूर महामार्गावरील गुरुग्राममधील सिद्रावली गावाजवळ शुक्रवारी रात्री तेलाच्या टँकरने कार आणि पिकअप व्हॅनला धडक दिल्याने चार जण ठार झालेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले होते. धक्कादायक बाब म्हणजे अपघातानंतर कारने पेट घेतल्याने चारही जणांचा जळून मृत्यू झाला.
दिल्ली-जयपूर महामार्गावर सिद्रावलीजवळ एका टँकरने कार आणि पिकअप वाहनाला धडक दिली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्ली-जयपूर महामार्गावर तेलाच्या टँकरने दुभाजकाला धडक दिल्याने आणि कार आणि पिकअप व्हॅनला धडकल्याने हा भीषण अपघात घडला आहे. या धडकेनंतर कारने पेट घेतला होता.
#WATCH | Haryana: A tanker hits a car and pickup vehicle near Sidhrawali on Delhi-Jaipur Highway. Further details awaited. pic.twitter.com/RhmzpS1PKL
— ANI (@ANI) November 11, 2023
बिलासपूर पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी विनोद कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जयपूरहून येणाऱ्या तेलाच्या टँकरने दुभाजक तोडून कारला धडक दिली. आतील प्रवासी बहुधा जयपूरला जात होते. धडक बसल्याने कारमधील सीएनजी सिलेंडरमुळे भीषण आग लागली आणि काही वेळातच संपूर्ण गाडीने पेट घेतला. धडक बसल्यानंतर आग लागल्यामुळे तिन्ही प्रवाशांचा मृत्यू झाला. कारला धडक दिल्यानंतर ऑइल टँकरची महामार्गावरील पिकअप व्हॅनला धडक बसली, त्यामुळे व्हॅन चालकाचा जागीच मृत्यू झाला.
#WATCH | “We had received information about an accident on the highway and that a vehicle caught fire…3 people died in the accident. It is suspected that the vehicle caught fire after colliding with the truck. A pickup vehicle was also hit, and a man was trapped in it, he was… pic.twitter.com/7MoSL52JKJ
— ANI (@ANI) November 11, 2023
‘दिल्ली-जयपूर महामार्गावर अपघात झाल्याची माहिती आम्हाला मिळाली. आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा आम्ही पाहिले की एक कार जळून राख झाली होती आणि तीन लोकांचा मृत्यू झाला होता. नंतर आम्हाला असेही कळले की पिकअप व्हॅनची एका ऑइल टँकरला टक्कर झाली, त्यामुळे व्हॅनचा चालक जागीच मरण पावला. मात्र, ऑइल टँकरचा आरोपी चालक पळून गेला असून त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे,’ असे तपास अधिकारी विनोद कुमार यांनी सांगितले.