Gadchiroli Government Ashram School 105 Students Infected With Food Poisoned

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Gadchiroli News :   गडचिरोली जिल्ह्याच्या (Gadchiroli) धानोरा तालुक्यातील (Dhanora) सोडे येथील शासकीय मुलींच्या आश्रमशाळेतील 105 विद्यार्थ्यांनींना जेवणातून विषबाधा झाली आहे. या विद्यार्थींनींना धानोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यातील 15 ते 20 मुलींना प्राथमिक उपचारानंतर सुटी दिली तर 73 विद्यार्थ्यांनींची प्रकृती गंभीर असल्यामुळे गडचिरोली जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांनींवर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली असून आदिवासी विकास प्रकल्पांमधील आश्रमशाळेतील व्यवस्थापनाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोडे येथील मुलींच्या आश्रमशाळेतील विद्यार्थीनींनी दुपारी 12 वाजताच्या सुमारास बटाटा-कोबीची भाजी, वरण आणि भात असे जेवण देण्यात आले. हे जेवण जेवल्यानंतर काही वेळाने मुलींना उलट्या आणि हगवण सुरू झाली. तेव्हा तेथील शिक्षकांनी दुपारी तीन वाजताच्या सुमारास सहा ते सात मुलींना धानोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू असतानाच आणखी मुलींना मळमळ, उलट्या आणि हगवणीचा त्रास सुरू झाला. त्यांना सुद्धा रुग्णालयात दाखवणे सुरू झाले. सायंकाळपर्यंत 105 मुलींना विषबाधा झाल्याने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जवळजवळ 15 मुलींना उपचारानंतर सुटी देण्यात आली असून 75 विद्यार्थ्यांनींवर उपचार सुरू आहेत. विद्यार्थिनींना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

सध्या सर्व विद्यार्थीनींची तब्येत धोक्याबाहेर असली तरी मुली अतिशय घाबरलेल्या असल्यामुळे त्यांना गंभीर म्हणून जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. दरम्यान गडचिरोलीचे सिव्हिल सर्जन डॉ. खंडाते आपल्या वैद्यकीय चमूसह परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. गडचिरोलीचे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी राहुल मीना हे स्वतः रुग्णालयात उपस्थित राहून आढावा घेत आहेत.

दरम्यान शाळेतील भोजनाचे कंत्राट देण्यात आले असले तरी शाळेतील कर्मचारीच स्वयंपाकाचे काम करीत असल्याचे समजते. या संदर्भात मुख्याध्यापक मंडलवार यांचेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचेशी संपर्क होऊ शकला नाही.

[ad_2]

Related posts