[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Anganwadi Sevik Protest : वाढीव वेतन व सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा, अंगणवाडी सेविकांचं आंदोलन
राज्यातल्या अंगणवाडी सेविकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज मुंबईतील आझाद मैदानात ठिय्या आंदोलन केलं. वाढीव वेतन, सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा आणि निवृत्तीवेतन या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. या मागण्यांसाठी आग्रही असलेल्या अंगणवाडी सेविका आज दुपारी आझाद मैदानाबाहेरील महापालिका मार्गावर मोठ्या संख्येनं दाखल झाल्या. आणि त्यामुळं त्या परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. राज्यातल्या अंगणवाडी सेविकांचं आपल्या मागण्यांसाठीचं आंदोलन जवळपास एक महिन्यापासून सुरु आहे. पण राज्य सरकारनं त्या आंदोलनांची दखल न घेतल्यानं अंगणवाडी सेविका आज आझाद मैदानावर दाखल झाल्या होत्या. या अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळानं आज रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेतली… मात्र शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्र्यांमधील बैठक निष्फळ ठरलेय..अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत कोणताही तोडगा निघाला नाही त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी संप सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतलाय.
[ad_2]