[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Jitendra Awhad Statement On Prabhu Shri Ram : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी शिर्डीत पक्षाच्या शिबिरात प्रभू श्रीराम (Shri Ram) मांसाहारी असल्याचे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. आव्हाड यांच्याविरोधात ठाण्यात अजित पवार गट (NCP Ajit Pawar) आक्रमक झाला आहे. आव्हाड यांच्या निवासस्थानाबाहेर महाआरती करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर, भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) गुरुवारी आव्हाडांविरोधात पोलीस तक्रार करणार आहेत.
जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डी येथील शिबिरात प्रभू श्रीराम हे मांसाहारी असल्याचे वक्तव्य केल्यानंतर ठाण्यातील आव्हाडांच्या घराबाहेर अजित पवार गटाच्या काही कार्यकर्त्यांनी निषेध केला. त्यांनी आव्हाडांच्या घराबाहेर महाआरती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तात्काळ अटकाव करत त्यांना ताब्यात घेतले.
अजित पवार गटाच्या आंदोलनाच्यावेळी अजित पवार गट आणि शरद पवार गटाचे दोन्ही कार्यकर्ते आमने-सामने आले होते अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रभू श्रीराम यांचा हातात फोटो घेऊन आंदोलन केले आहे.दोन्ही पक्षांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी दिल्या आहेत.काही काळ तनावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र यानंतर अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना वर्तक नगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.दरम्यान यावेळी प्रभू श्रीराम यांच्या फोटोची विटंबना झाली असल्याचं शरद पवार गटाचे कार्यकर्ते म्हणाले आहेत.
तर, आव्हाड यांच्या विरोधात येत्या 24 तासात गुन्हा दाखल करण्याची मागणी अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे केली आहे. गुन्हा दाखल न झाल्यास वर्तक नगर पोलीस ठाण्यात महाआरती करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला.
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी घराबाहेर आंदोलन करणाऱ्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांवर टीका केली आहे. माझ्या घरावर आता अजित पवार यांच्या चार समर्थकांनी आरती करण्याचा प्रयत्न केला. मोजून चारच जण होते. श्री रामाचा इतिहास माहित नसलेल्यांना इतिहास समजावून सांगावे लागेल, असे आव्हाड यांनी म्हटले.
माझ्या घरावर आता अजित पवार यांच्या चार समर्थकांनी आरती करण्याचा प्रयत्न केला. मोजून चारच जण होते. श्री रामाचा इतिहास माहित नसलेल्या औलादींना श्री रामाचा इतिहास समजून सांगावा लागेल. श्री रामाने वनवास केवळ एवढ्याचसाठी स्वीकारला होता की , त्यांच्या आईवडिलांमध्ये जे आपापसात ठरले…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 3, 2024
भाजप आक्रमक
भाजपही आव्हाडांच्या वक्तव्यावर आक्रमक झाली आहे. घाटकोपरचे आमदार राम कदम हे गुरुवारी सकाळी आव्हाडांविरोधात घाटकोपर चिराग नगर पोलीस स्टेशनला तक्रार करण्यासाठी जाणार आहेत. आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
भाजपच्या अध्यात्म आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनीदेखील आव्हाडांवर टीका केली आहे. रामायणात शूपर्णखादेखील रावणाला सांगते की प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण हे दोघेही कंदमुळे आणि फळ खातात. मात्र, आव्हाड प्रभू श्रीराम मांसाहार करत असल्याचे वक्तव्य करत असल्याची टीका त्यांनी केली. तर, नाशिकच्या काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास पुजारी हे देखील नाशिकच्या पंचवटी पोलिस ठाण्यात सकाळी आव्हाडांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी जाणार आहेत.
[ad_2]