[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
नवी मुंबई : नवी मुंबईत (Navi Mumbai) असलेल्या एपीएमसी मार्केटमध्ये (APMC Market) मराठा आंदोलकांनी मुक्काम केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर चार दिवस एपीएमसी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे अन्नधान्याचा तुटवडा देखील निर्माण होण्याची शक्यता आहे. याबाबत माथाडी कामगार नेते शशिकांत शिंदे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली.
नाशवंत असलेल्या भाजीपाला मार्केट आणि फळ मार्केटमध्ये राहत असलेल्या मराठा बांधवांना इतर ठिकाणी हलविण्याची विनंती यावेळी करण्यात आलीये. तसेच शेतकऱ्यांचा माल खराब होऊ नये म्हणून जरांगे पाटील यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आलाय. सरकारने चर्चा करण्यास वेळ घालविल्यास एपीएमसी मार्केटवरही मोठा परिणाम होऊ शकतो.
मराठा आंदोलनामुळे आधीच दोन दिवस एपीएमसी बंद आहे, त्यानंतर आता शनिवार आणि रविवारची सुट्टी असल्याने सलग चार दिवस एपीएमसीतील व्यवहार ठप्प राहणार आहेत. सलग चार दिवस एपीएमसी बंद राहणार असल्याने भाजीपाला , फळ , कांदा बाटाचा या जीवनावश्यक गोष्टींचा मुंबई आणि परिसरात कमतरता भासवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जीवनावश्यक गोष्टींची कमतरता निर्माण होऊन भाजीपाला, कांदा, बटाटा , फळे यांच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मनोज जरांगे यांच्या मागण्या काय काय?
– नोंद सापडणाऱ्यांच्या सोयऱ्यांनाही सरसकट प्रमाणपत्र द्या.
– शपथपत्र घेऊनच सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्या.
– कोर्टात आरक्षण मिळेपर्यंत मुला-मुलींना 100 टक्के शिक्षण मोफत करा.
– जिल्हास्तरावर वसतिगृह बांधा.
– आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करु नका, केल्यास मराठा आरक्षणाच्या जागा राखीव ठेवा .
– आंतरवालीसह राज्यातील सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या.
– SEBC अंतर्गत 2014 च्या नियुक्त्या त्वरित द्या .
– वर्ग 1 व 2 आणि पोलीस उपनिरीक्षक पदाच्या नियुक्त्या द्या.
– रात्रीपर्यंत शासननिर्णयाचे अध्यादेश द्या, आझाद मैदानात जात नाही.
गाड्या थेट मुंबई आणि ठाण्याच्या मार्केटमध्ये
मराठा आंदोलनामुळे नवी मुंबईतील वाशी एपीएमसी मार्केटमध्ये विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये, त्याचबरोबर मुंबई आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना अत्यावश्यक गोष्टी मिळाव्यात यासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अत्यावश्यक वस्तू घेऊन एपीएमसी मार्केटमध्ये येणाऱ्या गाड्या या शनिवारी मार्केटमध्ये न आणता थेट मुंबई, ठाणे आणि इतर जोडून असणाऱ्या महानगरपालिका क्षेत्रात आणत त्या ठिकाणच्या मार्केटमध्ये सेवा पुरवण्यासाठी सरकारने मुभा दिली आहे.
हेही वाचा :
Prakash Shendge on Maratha Reservation : सरकारनं जर वेगळं आरक्षण मराठ्यांना दिलं,त्यात परतीचे मार्ग कापले जातील, ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा इशारा
अधिक पाहा..
[ad_2]