[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Maharashtra BJP: डोंबिवलीमध्ये भाजपा (BJP) पदाधिकाऱ्याने आपल्याच पक्षातील महिला पदाधिकाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात मानपाडा पोलिसांनी (Manpada Police Station) गुन्हा दाखल करून घेतला आहे. मात्र, हा गुन्हा शिवसेना शिंदे (Shiv Sena Shinde Faction) गटाच्या दबावात घेतला असल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाला सहकार्य करणार नसल्याचा ठराव स्थानिक कार्यकर्त्यांनी केला आहे. भाजप पदाधिकाऱ्याविरोधात करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचे भाजप कार्यकर्त्यांनी म्हटले.
महिला सुरक्षेच्या तसेच महिलेवरील अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध आवाज उठवला जातो. मात्र, डोंबिवलीमध्येच एका भाजप महिला कार्यकर्त्या सुरक्षित नसल्याची घटना समोर आली. भाजपामध्ये गेली पाच वर्षे भाजपच्या ग्रामीण मंडळाच्या पदावर कार्यरत असलेल्या एका महिलेकडे भाजपाचेच डोंबिवली पूर्व मंडळाचे अध्यक्ष नंदू जोशी यांनी वारंवार शारीरिक सुखाची मागणी केली असल्याचा गौप्यस्फोट भाजपा महिला कार्यकर्तीने केला आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे.
पीडित महिला ही 48 वर्षांची असून ती एका पोलीस अधिकाऱ्यांची पत्नी आहे. गेल्या पाच वर्षापासून पती पत्नीमध्ये वाद सुरू आहे. त्यामुळे पीडित महिला पतीपासून विभक्त राहत आहे. त्यातच गेली पाच वर्षांपासून त्या भाजप महिला कार्यकर्ती डोंबिवलीम्हणून काम करत आहे. याच संधीचा फायदा घेत भाजपा मंडळ अध्यक्ष नंदू जोशी याने पीडित महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे पीडित महिलेने यापूर्वी अनेकवेळा भाजपच्या वरिष्ठ नेत्यासह भाजपाच्या जिल्हा अध्यक्षांना नंदू जोशी विषयी तक्रारी केल्या होत्या. स्थानिक पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला होता. त्यानंतरही पोलीस आणि भाजपा पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने नंदू जोशी यांची हिंमत वाढत गेली. अखेर पीडित महिला कंटाळून त्यांनी मानपाडा पोलीस स्टेशनला धाव घेतली.
गुन्हा दाखल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याविरोधात भाजपचा मोर्चा
दरम्यान मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये पीडित महिला गुन्हा दाखल करण्यासाठी सतत हेलपाटे मारत होत्या. मात्र, नंदू जोशी हा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा कट्टर समर्थक असल्याचे बोलले जाते. त्यामुळेच तत्कालीन पोलीस अधिकारी या गुन्ह्याकडे दुर्लक्ष करत होते. अखेर मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी पीडित महिला भाजपा कार्यकर्तीची सत्यता जाणून घेतल्यानंतर कुठल्याही दबावाला बळी न पडता नंदू जोशीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. दाखल झालेला गुन्हा हा खोटा आहे असा दावा करत भाजप कार्यकर्त्यांनी मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या विरोधात मोर्चा काढला. पोलिसांना शिंदे गट पाठीशी घालत आहे असा आरोप करत भाजपा कार्यकर्त्यांनी जोपर्यंत पोलीस निरीक्षक बागडे यांची बदली होत नाही तोपर्यंत शिवसेनेचे काम करायचे नाही असा ठराव भाजपच्या बैठकीत पास केला आहे.
जीवे मारण्याची धमकी; पीडितेचा आरोप
गुन्हा दाखल होऊन सात ते आठ दिवस झाले आहेत. तरी अद्याप आरोपीला पोलिसांनी अटक केली नाही. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांची बदली होताच तुला जीवे ठार मारणार असल्याची धमकी आरोपी जोशी याच्याकडून धमकी दिली जात असल्याचा आरोप पीडितेने केला आहे. त्याच्या दहशतीमुळे घराबाहेर पडणे ही मुश्किल केले आहे. त्यामुळे त्याला पोलिसांनी लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी पीडित महिलेने केली आहे. दरम्यान, या प्रकरणांमध्ये बोलण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.
[ad_2]