[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Tadoba Ragava – Tiger Fight : रानगवा-वाघाच्या झुंजीचा व्हिडीओ व्हायरल ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वाघ आणि रानगव्याच्या थरारक झुंझीचा व्हिडीओ आला पुढे… चंद्रपूर शहरातील वन्यजीव प्रेमी भूषण थेरे यांनी काल आपल्या कॅमेऱ्यात कैद केला हा थरारक प्रसंग, मोहर्ली परिसरातील पाणवठ्यावर छोटा दडियल या वाघाने एका रानगव्यावर घात लावून केला हल्ला, रानगवा वाघाच्या तावडीतून निसटण्याचा निकराने करत होता प्रयत्न, मात्र वाघाने रानगव्याची मान आपल्या जबड्यात अतिशय मजबुतीने धरली होती पकडून, मात्र अचानक रानगव्याच्या कळपातील अल्फा नराने मदतीसाठी वाघावर चढविला प्रतिहल्ला, अल्फा नराच्या ताकतीचा अंदाज असल्याने छोट्या दडीयल ने शिकार सोडून काढला पळ, अल्फा नर गव्याच्या ताकतीचा पुन्हा एकदा आला प्रत्यय
[ad_2]