case of tiger and tigress named Akbar Sita reached the High Court Objection to name petition filed marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Safari Park : कोलकाता (Kolkata) येथील बंगाली सफारी पार्कमध्ये (Safari Park) सिंह-सिंहिणीची (lion-lioness ) जोडी आणण्यात आली आहे. 12 फेब्रुवारी रोजी या सिंह-सिंहिणीच्या जोडीला त्रिपुरातील विशालगड येथील प्राणी संग्रहालयातून बंगाल सफारी पार्कमध्ये आणण्यात आले. पण गोंधळ तिथेच झाला. सफारी पार्कमध्ये आणलेल्या सिंहिणीचे नाव सीता (Sita), तर वाघाचे नाव अकबर (Akbar) असे असल्याचे सांगण्यात येत आहे. अशात विश्व हिंदू परिषदेच्या सदस्यांनी सिंहिणीला सीतेचे नाव देण्यावर तीव्र आक्षेप व्यक्त केला आहे. याच कारणामुळे सिंहिणीचे नाव बदलण्यासाठी विहिंपतर्फे शुक्रवारी याचिका दाखल करण्यात आली आहे. कोलकाता उच्च न्यायालयात (High Court) राज्याविरोधात ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

 

सिंह-सिंहिणीच्या नावामुळे गोंधळ

विश्व हिंदू परिषदेने यासंदर्भात सांगितले की, दोन्ही वाघाच्या जोडप्यांना त्रिपुराहून बंगाल सफारी पार्कमध्ये आणण्यात आले आहे. अधिकृत कागदपत्रांमध्ये त्यांची नावे पँथर नर आणि मादी अशी लिहिली होती. त्याला ओळखपत्र क्रमांकही दिला होता. मात्र बंगालमध्ये आल्यानंतर वाघ आणि वाघिणीची नावे बदलण्यात आली. दोघांची नावे अकबर आणि सीता होती. यावर भाजपचे वकील तरुणज्योती तिवारी म्हणाले की, ममता बॅनर्जी यांनी नेहमीच हिंदू धर्माविरोधात अशा गोष्टी केल्या आहेत. या राज्यात दुर्गापूजेसाठी उच्च न्यायालयात जावे लागते. हा प्रकार कोणी केला असेल, त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, असे ते म्हणाले.

 

न्यायालयात याचिका दाखल

याचिकाकर्त्याचे ‘ॲडव्होकेट-ऑन-रेकॉर्ड’ शुभंकर दत्ता यांनी पीटीआयला सांगितले की, विहिंपच्या उत्तर बंगाल युनिटने 16 फेब्रुवारी रोजी याचिका दाखल केली. 20 फेब्रुवारी रोजी न्यायालयाच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होण्याची शक्यता आहे. ते म्हणाले की, याचिकाकर्त्याने विनंती केली आहे की वाघिणीचे नाव बदलण्यात यावे, कारण प्राण्याचे नाव अशा प्रकारे ठेवल्याने धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात. भविष्यात कोणत्याही प्राणी उद्यानातील कोणत्याही प्राण्याला कोणत्याही धर्माच्या देवी-देवतांचे नाव देऊ नये, अशी विनंतीही करण्यात आल्याचे दत्ता यांनी सांगितले. कौन्सिलच्या उत्तर बंगाल युनिटने सांगितले की, बंगाल सफारी पार्कमध्ये सिंह-सिंहिणीला आणण्यात आले होते आणि सिंहिणीचे नाव ‘सीता’ ठेवण्यात आले होते. तर यावर वन अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी दोन प्राण्यांची ही नावं दिलेली नाही, तसेच या प्राण्यांची अधिकृत नावे अद्यापही देण्यात आलेली नाहीत.

 

इतर बातम्या

Ram Mandir UAE : PM मोदींनी अबुधाबीत राम मंदिराच्या उद्घाटनप्रसंगी ‘कुराण’ चा केला उल्लेख, काय म्हणाले पंतप्रधान जाणून घ्या

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts