Ravindra Dhangekar on Pune Drugs case police lalit patil marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ravindra Dhangekar on Pune Drugs case : पबमध्ये ड्रग्स मिळतात, पुण्याची ओळख उडता पंजाब सारखी होत आहे. म्हणून विद्येच्या माहेरघरात हुक्का पार्लर, पब संस्कृती बंद व्हावी. आमदार रविंद्र धंगेकर यांची मागणी. चार हजार कोटींचे ड्रग्स सापडणे म्हणजे पुणे पोलिसांचे अपयश आहे. असा आरोप काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांनी पोलिसांवर केलाय.

पुण्यात पब संस्कृतीमुळे ड्रग्जचा महापूर वाहतोय, त्यामुळे पुण्यात पब नकोतच अशी भूमिका काँग्रेस आमदार काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांनी घेतलीय. 4000 कोटी रूपयांचे ड्रग्ज सापडणं म्हणजे पुणे पोलिसांचं अपयश आहे अशी टीका त्यांनी केलीय. पुण्यात ड्रग्जप्रकरणी आंतरराष्ट्रीय रॅकेट कार्यरत आहे असा आरोप त्यांनी केलाय. 

पुण्यात अनेक ललीत पाटील – 

पुण्यात आणि इतर ठिकाणी 400 कोटी रुपयांचे ड्रग्स मिळून आले आहेत. पुणे जिल्ह्यात ड्रग्स बनवण्याचा कारखाना मिळाला. ललित पाटील प्रकरण तपास सरकारने पूर्ण केला नाही. सरकारने संजीव ठाकूर यांना पाठीशी घालून कुठली ही कारवाई त्यांच्यावर केली नाही. ललित पाटील प्रकरण वेळीस मी म्हणालो होतो की ड्रग्स प्रकरणी अंतराष्ट्रीय रॅकेट टोळी आहे. पुण्यात अनेक ललित पाटील कार्यरत आहेत. पुणे पोलीस आयुक्तांनी पब बाबत निर्णय घेतला मी दावा करतो की याच पबमध्ये ड्रग्स मिळतात. पब संस्कृती पुण्यात नसू नये, हे पुणेकरांचे मत आहे. 4000 कोटी रुपयांचे ड्रग्स सापडणे म्हणजे पुणे पोलिसांचे अपयश आहे. कारण पोलिसांची यंत्रणा करतेय काय? गुप्तचर यंत्रणा आणि पोलिसांची एल आय बी काय करतायत, असा आरोप आमदार रविंद्र धंगेकर म्हणाले.   

ड्रग्स रॅकेटचा ‘मास्टरमाईंड’ मूळचा पंजाब प्रांतातील 

पुण्याच्या आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा ‘मास्टरमाईंड’ मूळचा पंजाब प्रांतातील आहे. “तो” कुटुंबीयांसह गेल्या अनेक वर्षांपूर्वी इंग्लंड मध्ये स्थाईक आहे. 2016 मधील कुरकुंभ येथे मारलेल्या छाप्यात त्याला पकडण्यात आले होते. यावेळी 350 किलो चे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते आणि या प्रकरणात तो कारागृहात शिक्षा भोगत होता. कारागृहात शिक्षा भोगत असताना ‘मास्टरमाईंड’ची वैभव माने आणि हैदर शेख याच्याशी ओळख झाली आणि या ड्रग्स प्रकरणाला सुरुवात झाली.  त्या ठिकाणी वैभव माने आणि हैदर शेख याच्याशी त्याची ओळख झाली आणि या ड्रग्स प्रकरणाला सुरुवात झाली.

मेफेड्रॉनच्या तस्करांनी ठेवलेले कोड वर्ड्स उघड 

पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणात धक्कादायक माहिती समोर, मेफेड्रॉनच्या तस्करांनी ठेवलेले कोड वर्ड्स उघड, आरोपी वैभव मानेला ‘लंबा बाल’ तर मुंबईत राहणाऱ्या युवराज भुजबळला ‘मुंबई का बंदर’  म्हणून ओळखलं जायचं. 

मेफेड्रॉनची तस्करी करण्यासाठी टोळीने  टोपण नावे तयार केली होती. ड्रग्स रॅकेट मध्ये “लंबा बाल” आणि “मुंबई का बंदर” या टोपण नावांचा वापर करण्यात आला. 
सराईत वैभव माने याला केसांची शेंडी होती. त्यामुळे त्याला “लंबा बाल” म्हणून ओळखले जात होते. मुंबईत राहणारा युवराज भुजबळ याला “मुंबई का बंदर” म्हणून बोलावले जात होते. आरोपींचा मोबाइल डेटा रिकव्हर केल्यानंतर गुन्हे शाखेला कोडिंगची उकल करण्यात पोलिसांना यश आले.  

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts