Ajit Pawar Wife Sunetra Pawar started preparing for Lok Sabha Election Baramati tours increased marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

बारामती : मागील काही दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघ (Baramati Lok Sabha Constituency) अधिकच चर्चेत आला असून, सुप्रिया सुळेंविरोधात (Supriya Sule) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे आता या फक्त चर्चाच नसून प्रत्यक्षात सुनेत्रा पवार लोकसभा निवडणूकीत (Lok Sabha Election) उतरणार असल्याचे जवळपास निश्चित असल्याचे बोलले जात आहे. त्याचं कारण म्हणजे सुनेत्रा पवार यांचे बारामती मतदारसंघातील दौरे वाढले आहेत. सोबतच त्यांच्याकडून बारामतीत भेटीगाठी घेतल्या जात आहे. आज देखील सुनेत्रा पवार या बारामतीचा (Baramati) दौरा करत आहेत. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या आज बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत. बारामतीतील विविध ठिकाणी सुनेत्रा पवार आज विविध विकास कामांचा शुभारंभ आणि गाठीभेटी घेणार आहेत. बारामतीतील सूर्यनगरी परिसरात सुनेत्रा पवार यांच्या हस्ते रस्त्याचे भूमिपूजन झाले. गेल्या काही दिवसापासून बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवारांचे दौरे वाढले आहेत. विशेष म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघासाठी त्यांच्या नावाची चर्चा असतानाच त्यांच्याकडून होणाऱ्या गाठीभेटी पाहता आगामी काळात नणंद-भावजयीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 

सुनेत्रा पवारांचं सूचक वक्तव्य…

मागील काही दिवसांपासून सुनेत्रा पवार या सतत बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा करत आहे. दरम्यान, गुरुवारी (22 फेब्रुवारी) अखिल बारामती लोहार समाज श्री विश्वकर्मा जयंती उत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून सुनेत्रा पवार या उपस्थित होत्या. यावेळी बोलतांना त्यांनी एक सूचक वक्तव्य केले आहेत. “मी भिगवणमध्ये पहिल्यांदा आले आहे. प्रचाराच्या निमित्ताने मी कधी भिगवणमध्ये आले नव्हते, पण आता भिगवणमधील लोकांच्या भेटी वारंवार घ्याव्या लागतील” असं सुनेत्रा पवार म्हणताच एकच हशा पिकला. 

सुप्रिया सुळे देखील बारामतीत…

मागील अनेक वर्षांपासून बारामती लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. शरद पवारांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या बारामतीचा नेतृत्व सुप्रिया सुळे आणि अजित पवारांकडे असल्याचे पाहायला मिळाले. मात्र, आता राष्ट्रवादीत शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट झाले आहेत. त्यामुळे मागील महिन्यात पुलाखालून बरेच पाणी गेले आहेत. त्यात आता अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरु आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी देखील कंबर कसली आहे. सुप्रिया सुळे या देखील बारामतीचा दौरा करत असून, आज देखील त्या बारामती लोकसभा मतदारसंघात असणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Sunetra Pawar : बारामतीमध्ये भावनिक साद अन् इंदापूर तालुक्यात ते सूचक वक्तव्य; सुनेत्रा पवारांचा सुद्धा ‘राज’कीय सूर!

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts