Pune Ravindra Dhangekar reaction on running drug free maharashtra campaign 25 lakh reward to pune police

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे :  पुणे पोलिसांच्या इतिहासात हजारो कोटींचे ड्रेस जप्त करण्यात आल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलिसांच्या कारवाईच कौतुक करत 25 लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर केलं आहे. त्यावरुन आता आमदार रविंद्र धंगेरकरांनी राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांचा चांगलाच समाचार घेतला आहे.  ड्रग्स कारवाईसाठी पुणे पोलिसांना 25 लाखांचं बक्षिस देऊन  देवेंद्र फडणवीस हे गृहखात्याचं अपयश लपवत आहे. एवढंच होतं तर यापूर्वी हे ड्रग्स का नाही सापडलं, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. 

रविंद्र धंगेकर काय म्हणाले?

ललित पाटीलकडे ज्यावेळी एवढ्या मोठया प्रमाणात ड्रग्स सापडले होते. त्यावेळी त्याला अटक केली होती मात्र संजीव ठाकूरला अटक करण्यात आली नाही. संजीव ठाकूरलादेखील अटक करायला हवी होती. तेव्हापासून पुण्यात डग्स रॅकेटची चर्चा आहे. संजीव ठाकूरांना अटक करण्यासाठी गृहखात्याला पत्र दिलं होतं मात्र अजूनही त्यांना अटक कऱण्यात आली नाही. याचा अर्थ या प्रकरणात भाजपच्या नेत्यांचा काहीतरी संबंध आहे. त्यासोबतच पुण्यात मागील दोन दिवसात 4000 कोटींचं ड्रग्स सापडलं पण मागील वर्षभरापासून ड्रग्स रॅकेटचा खुलासा करा, त्याची पाळेमुळे शोधून काढा, याची मागणी आम्ही करत आहोत. मात्र आताच हे ड्रग्स कसे सापडले. जर हे ड्रग्स आता सापडले तर वर्षभर तपास यंत्रणा काय करत होती? असा प्रश्न मी पुणे पोलिसांना विचारला होता. त्यानंतर काल  फडणवीसांनी आपलं अपयश लपवण्यासाठी 25 लाखांचं बक्षिस जाहीर केलं.  

ड्रग्स आरोपींना वरदहस्त

कुरकुंभमध्ये असणारा ड्रग्सच्या कारखान्याचा मालक कोण आहे. त्याचा शोध घेतला पाहिजे. हा कारखाना दोन दिवसांत नाही तर अनेक वर्षांपासून सुरु होता. त्यामुळे यापूर्वी या कारखान्याची माहिती कशी कोणाला समजली नाही शिवाय संदिप धुनियाचा पोलीस शोध घेत आहे. त्याला 2016 मध्येही अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्याला जामीन कसा मिळाला,असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. त्यासोबच या आरोपींना कोणाचातरी वरदहस्त आहे याशिवाय हे प्रकार सुरु राहू शकत नाही, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. पुणे पोलीस आणि गृहखात्यानं या सगळ्या ड्रग्स रॅकेटचा खुलासा केला जर यापुढे ड्रग्स विकणारा कधीही असं रॅकेट चालवण्याचं धाडस करणार नाही, असंही ते म्हणाले. 

इतर महत्वाची बातमी-

Ramesh Pardesi drugs Video : ड्रग्सच्या नशेतील पोरींचा व्हिडीओ पिट्या भाईंकडून समोर; ‘त्या’ संध्याकाळी वेताळ टेकडीवर नेमकं काय घडलं?

 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts