government truecaller service trai recommends telcos to display calling name to check unsolicited calls know all details

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

TRAI Recommend New Rules For Caller Name: भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने स्पॅम आणि स्कॅम कॉलवर कारवाई करण्याची शिफारस केली आहे. याच्या मदतीनं यूजर्सच्या फोनवर येणाऱ्या अनोळखी नंबर्सचं नावही कळणार आहे. दरम्यान, आजकाल फोनवर अनेक कॉल्स येतात, जे प्रमोशनल असतात. हा कॉल कधीकधी काही युजर्ससाठी समस्या निर्माण करतो. यावर मात करण्यासाठी ट्रायनं कॉलर आयडी डिस्प्ले (Caller ID Display) सेवा सुरू करण्याची शिफारस केली आहे.

TRAI नं शुक्रवारी टेलिकॉम नेटवर्कसाठी कॉलिंग नेम प्रेझेंटेशन (CNAP) पूरक सेवा सुरू करण्याची शिफारस केली. या सेवेनंतर यूजर्सच्या फोनवर कॉलरचं नाव दिसेल. दरम्यान, हे फिचर कसं काम करेल? याबद्दल अधिक तपशील लवकरच उघड केले जातील.

सरकारनं मार्गदर्शक तत्त्वं जारी करावी, TRAI ची शिफारस 

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) नं CNAP फिचर्स आणण्यासाठी सरकारनं मार्गदर्शक तत्त्वं जारी करण्याची शिफारस केली आहे. यासह, CNAP भारतात उपलब्ध असलेल्या सर्व डिव्हाईसवर प्रदर्शित केलं जाईल. ट्रायच्या या शिफारसी अद्याप स्वीकारण्यात आलेल्या नाहीत. शिफारशी लागू झाल्यानंतर, सरकार CNAP फिचर्स लागू करण्यासाठी सुमारे सहा महिने देईल.

CAF फॉर्मसह नावंही दाखवणार

ट्रायनं आपल्या शिफारसींमध्ये म्हटलं आहे की, टेलिकॉम ग्राहकांद्वारे ओळख माहिती प्रदान केली जाईल. हे ग्राहकांच्या अर्जात (CAF) मध्ये दिलेलं नाव असावं. जेव्हा कोणीही कॉल करेल, तेव्हा कॉलरचं नाव स्क्रीनवर युजर्सना दिसेल. 

अनेक ॲप्सवर दिसतात अनोळखी कॉलरची नावं

सध्या, अज्ञात कॉलचे तपशील देण्यासाठी अनेक थर्ड पार्टी ॲप्स उपलब्ध आहेत, ज्यात Truecaller, भारत कॉलर आयडी आणि अँटी-स्पॅम समाविष्ट आहेत. अनेक हँडसेट मॅन्युफॅक्चररनी स्पॅम कॉल्सची माहिती देणारं हे वैशिष्ट्य प्री-इंस्टॉल केलं आहे. ही सेवा क्राउड-सोर्स डेटाद्वारे माहिती गोळा करते.

कशी मिळेल सुविधा? 

सर्व दूरसंचार कंपन्या ग्राहकांच्या विनंतीनंतर ही सुविधा देतील. आतापर्यंत मोबाईलवर कॉल करणाऱ्या व्यक्तीचं नाव लिहिलेले नसायचं, फक्त 10 अंकी मोबाईल नंबरच दिसायचा. मात्र, कॉलरनं नेम प्रेझेंटेशनच्या सुविधेनंतर कॉल करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं नाव मोबाईलवर दिसेल. अशा परिस्थितीत लोकांना नको असलेल्या कॉल्सपासून बऱ्याच अंशी दिलासा मिळेल. CNAP सुविधा सुरू केल्यानंतर, ग्राहक त्यांच्या फोन स्क्रीनवर कॉलरचं नाव पाहू शकतील.

दूरसंचार नियामकानं शिफारस केली आहे की, सर्व टेलिफोन ग्राहकांना विनंतीनुसार CNAP सेवा प्रदान करावी. TRAI ने नोव्हेंबर 2022 मध्ये या संदर्भात एक सल्ला पत्र जारी केलं होतं, ज्यामध्ये भागधारक, सार्वजनिक आणि उद्योग यांच्याकडून टिप्पण्या मागितल्या होत्या.

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts