Rohit Sharma & Sarfaraz Khan Viral Video Delhi Police has shared a video on Twitter about wearing helmets on bikes

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Rohit Sharma & Sarfaraz Khan Viral Video : मुंबई पोलिसांसह दिल्ली पोलिसांचे सुद्धा सूचक इशारा देणारे ट्विट अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. यावेळी, दिल्ली पोलिसांनी बाईकवर हेल्मेट घालण्यासंदर्भात ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेची क्लिप आहे. या व्हिडिओसोबत दिल्ली पोलिसांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “टू व्हीलरवर हिरो व्हायचं नाही, नेहमी हेल्मेट घाला.”

रोहित शर्माने सरफराजला हेल्मेट घालण्यास सांगितले

दिल्ली पोलिसांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा सरफराज खानला क्षेत्ररक्षण करताना हेल्मेट घालण्यास सांगतो. सरफराज हेल्मेटशिवाय सिली पाँईंटवर क्षेत्ररक्षण करण्यासाठी तयार होता. त्यानंतर रोहित शर्मा सरफराज खानला सांगतो, अरे इथं हिरो बनू नकोस, हेल्मेट घाल. यानंतर केएस भरत हेल्मेट घेऊन येतो आणि त्यानंतर सरफराज खान हेल्मेट घालून फिल्डिंगला सुरुवात करतो.

दिल्ली पोलिसांचा व्हिडिओ

दिल्ली पोलिसांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर यूजर्सनेही जोरदार कमेंट करायला सुरुवात केली. या व्हिडिओवर एका यूजरने लिहिले की, हिरो बनण्यासाठी थेट मुंबई पोलिसांशी संपर्क साधा. या फोटोवर बहुतेक युजर्सनी लिहिले की, “रोहित शर्मा जागरूकता पसरवत आहे.

दिल्ली पोलिसांनी पोस्ट केलेला हा व्हिडिओ इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील 47व्या षटकाचा आहे. त्यावेळी कुलदीप यादव गोलंदाजी करत होता. कुलदीपच्या चौथ्या चेंडूपूर्वी सर्फराज खान मिड-ऑन एरियात क्षेत्ररक्षण करत होता. यानंतर कर्णधार रोहित शर्माने त्याला सिली मिडऑफमध्ये क्षेत्ररक्षणासाठी बोलावले, त्यानंतर सरफराज खान हेल्मेटशिवाय क्षेत्ररक्षणासाठी उभा राहिला.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts