Prime Minister Narendra Modi gift of crores to country today 2000 railway projects, spending 41 thousand crore rupees

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

PM Modi : आजचा दिवस हा देशासाठी ऐतिहासिक असून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) देशाला कोट्यवधींची भेट देणार आहेत. अमृत भारत स्टेशन योजनेच्या अंतर्गत पंतप्रधान मोदींच्या हस्ते देशभरातील 554 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास, 1500 रोड ओव्हर ब्रिज आणि अंडरपासचे भूमिपूजन तसेच उद्घाटन करण्यात येणार आहे.

 

पंतप्रधान मोदींची सोशल मीडियावर पोस्ट

या कार्यक्रमाची माहिती स्वत: पंतप्रधान मोदींनी त्यांच्या सोशल मीडियावर दिली. एक पोस्ट शेअर करताना पंतप्रधानांनी आजचा दिवस ऐतिहासिक दिवस असल्याचे म्हटलंय. पंतप्रधानांनी लिहिले की, आज आपल्या रेल्वेसाठी ऐतिहासिक दिवस आहे! पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. पंतप्रधानांनी पोस्टमध्ये लिहिले की, ही कामे लोकांसाठी ‘जीवन सुलभता’ वाढवतील.

 

विविध रेल्वे आणि पायाभूत सुविधांच्या विकास प्रकल्पांचा समावेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या प्रकल्पांचे उद्घाटन करणार, त्यात अनेक रेल्वे आणि पायाभूत सुविधांच्या विकास प्रकल्पांचा समावेश आहे. चर्नी रोड स्टेशन परिसरातील रेल्वेच्या कार्यालयात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

 

 

533 रेल्वे स्थानकांची निवड

मिळालेल्या माहितीनुसार, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून 533 रेल्वे स्थानकांची निवड करण्यात आली आहे. 19,000 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून या रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांना सर्व प्रकारच्या आधुनिक सुविधा मिळणार आहेत. यामध्ये मुलांसाठी खेळण्याची जागा, फूड कोर्ट, इंटर मॉडेल कनेक्टिव्हिटी अशा अनेक सुविधांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ही स्थानके पर्यावरण आणि अपंगांसाठी अनुकूल असणार आहेत. यासोबतच स्थानकांवर आपल्या भारतीय संस्कृतीची झलक पाहायला मिळणार आहे.

 

आधुनिक सुविधा मिळणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील अनेक भागात रोड ओव्हर ब्रिज (ROB) आणि अंडरपासची (RUB) पायाभरणी करणार आहेत. कार्यक्रमांतर्गत, उत्तर रेल्वेच्या 92 ROB आणि RUB मध्ये उत्तर प्रदेशातील 56, हरियाणामधील 17, पंजाबमध्ये 13, दिल्लीत चार, हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये प्रत्येकी एक, लखनौ विभागात 43, दिल्ली विभागात 30, द. फिरोजपूर विभागात 10 ROB आणि RUB ची पायाभरणी केली जाईल, अंबाला विभागात 7 आणि मुरादाबाद विभागात 2 असतील

 

हेही वाचा>>>

PM Modi : ‘सर्व मंत्र्यांनी पुढील 100 दिवसांचा ‘Action Plan’पाठवा!’ पंतप्रधान मोदींच्या स्पष्ट सूचना, बैठकीत काय म्हणाले मोदी?

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts