WhatsApp New Updates Floating Action Button Design Change Interface In Future Tech News Marathi

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

WhatsApp  New Updates :  जगातील सर्वात लोकप्रिय मेसेंजर अॅप म्हणून व्हॉट्सअॅपची (WhatsApp) ख्याती आहे. यूजर्सना जास्तीत जास्त चांगली सेवा मिळावी, यासाठी व्हॉट्सअॅप नेहमी नवीन अपडेट्स आणत असते. अशातच आता व्हॉट्सअॅप नवीन अपडेट्सवर काम करत असल्याचं समोर आलं आहे. व्हॉट्सअॅपकडून नवीन फ्लोटिंग अॅक्शन बटणच्या निर्मितीवर (WhatsApp new floating action button design) काम सुरू आहे. या नवीन अपडेटमुळे व्हॉट्सअॅप अॅप्लिकेशनमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. कारण यापूर्वीच कंपनीकडून  Android version 2.23.10.6 साठी व्हॉट्सअॅप बीटा रिलीज करण्यात आला, ज्यामध्ये बॉटम नेव्हिगेशन बारसोबत रिडिझाइन केलेला इंटरफेस उपलब्ध करून देण्यात आला आहे. Gizmochina  या चीनी वृत्तपत्रातील एका बातमीनुसार, व्हॉट्सअॅपचा हा बदल या गोष्टींचे संकेत देत आहे की, व्हॉट्सअॅप लहान किंवा मोठी पाऊलं टाकत आहे. यामुळे कंपनी आपल्या पूर्ण अॅपलाच नवीन डिझाइनमध्ये लाँच करणार आहे.

नवीन अपडेट्सबद्दल असं समजलं 
   
अॅपच्या रिडिझाइनची शक्यता तेव्हाच वाटली जेव्हा Android version 2.23.12.3 अपडेटसाठी WhatsApp beta वर लक्ष देण्यात आले. या टॉगलसाठी नवीन  स्टाईल शोकेस तयार करण्यात आले आहे. कंपनीकडून बारीक-बारीक गोष्टींवर लक्ष दिलं जात आहे. अलिकडे अ‌ॅण्ड्रॉईड व्हर्जन 2.23.12.15 च्या  व्हॉट्सअॅप बीटा अपडेटमध्ये (WhatsApp Beta update) एक महत्त्वाचा बदल केला आहे. 

यूजर्स लवकरच नवीन चॅटला करू शकतात सुरू 

सध्या व्हॉट्सअॅप फ्लोटिंग अॅक्शन बटणला नवीन डिझानइनमध्ये लाँच करायच्या तयारीत आहे. हे नवीन फ्लोटिंग अॅक्शन बटण किंचित गोलाकार कडा असलेल्या चौकोनी आकाराचं असेल. हे मटेरियल डिझाइन 3 मार्गदर्शक तत्त्वांनुसार असणार आहे. हे रिडिझाइन फक्त फ्लोटिंग अॅक्शन बटणावर लागू होणार नाही, तर कॉल आणि स्टेटस टॅबवरील बटणांना देखील लागू होणार आहे.

सध्या प्राथमिक अवस्थेत आहे अपडेट 

सध्या फ्लोटिंग अॅक्शन बटणच्या नवीन व्हर्जनवर काम करत आहे. भविष्यात अॅप अपडेटसाठी बीटा टेस्टर्सना अॅक्शन बटण उपलब्ध करून दिलं जाईल. कंपनीला यूजर्सकडून नवीन इंटरफेसची रिक्वेस्टही मिळत आहेत. असं मानलं जात आहे की, यूजर्सच्या या रिक्वेस्टला कंपनीने लक्षात ठेवलं आहे. या इंटरफेस रिडिझाइन व्यतिरिक्त  कंपनी अनेक नवीन फिचर्सवर काम करत आहे. या अॅपच्या बीटा व्हर्जनमध्ये हाय क्वालिटी फोटो शेअरिंगचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे तु्म्ही फोटोच्या क्वालिटीवर कोणत्याही इफेक्टचा वापर न करता एचडी दर्जाचे फोटो शेअर करू शकाल. तसेच कंपनी अॅण्डॉईड यूजर्ससाठी स्क्रीन शेअरिंग फीचरवर देखील काम करत आहे.

इतर बातम्या वाचा :

WhatsApp Update : व्हॉट्सअॅप आणणार भन्नाट फीचर, कंटेट क्रिएटर्ससाठी फायदेशीर ठरणार; जाणून घ्या कसं असेल नवीन फीचर?

[ad_2]

Related posts