WTC 2023 Final ICC Fined India For slow over rate Gill Fined 15 Percent Match Fees ; WTC फायनलमधील पराभवानंतर ICCने भारतीय संघ आणि शुभमन गिलला केला मोठा दंड

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ओव्हल: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून २०९ धावांनी पराभव झाल्यानंतर रोहित शर्मा आणि टीम इंडियासाठी वाईट बातम्या येत आहेत. भारताने सलग दुसऱ्यांचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गमावली आणि त्यानंतर संघासोबत सर्व काही ठीक होत नसल्याचे चित्र आहे.

ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या या दारूण पराभवानंतर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने संपूर्ण भारतीय संघावर मोठी कारवाई करत दंड केला आहे. आयसीसीने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार भारतीय संघाने फायनल मॅचमध्ये धीम्या गतीने गोलंदाजी केली त्यामुळे संपूर्ण संघाची पूर्ण मॅच फी इतका दंड करण्यात आला आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय गोलंदाजांनी निर्धारित केलेल्या लक्ष्या पेक्षा पाच ओव्हर कमी टाकल्या ज्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

WTC फायनल गमावल्यानंतर हे बोलण्याची हिम्मत कोणीच दाखवली नाही, शास्त्रींनी BCCIसह सर्वांना…
आयसीसीने फक्त भारतावरच नाही तर नवे टेस्ट चॅम्पियन ऑस्ट्रेलियावर देखील धीम्या गतीने गोलंदाजी केल्याबद्दल कारवाई केली आहे. ऑस्ट्रेलियाने निर्धारित केलेल्या लक्ष्या पेक्षा ४ ओव्हर कमी टाकल्या. ऑस्ट्रेलिया संघाला ८० टक्के इतका दंड केला आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स या दोघांनी चूक मान्य केल्याने याबाबत कोणतीही सुनावणी झाली नाही.

वनडे World Cupचे वेळापत्रक ड्राफ्ट, ८ ऑक्टोबरला चेन्नईत पहिली मॅच; असे आहे टीम इंडियाचे शेड्यूल

शुभमन गिलला मोठा दंड

भारतीय संघावर झालेल्या कारवाई सोबत सलामीवीर शुभमन गिलवर आयसीसीने दंडात्मक कारवाई केली आहे. अंपायर्सच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केल्याबद्दल गिलवर १५ टक्के इतका दंड करण्यात आला आहे. त्यामुळे त्याचा एकूण दंड ११५ टक्के इतका झाला आहे. भारताच्या दुसऱ्या डावात गिलला वादग्रस्त पद्धतीने बाद दिले होते. कॅमरून ग्रीनने स्पिलमध्ये त्याचा कॅच घेतला होता. तिसऱ्या अंपायरने तो कॅच योग्य ठरवले आणि गिलला बाद दिले. या निर्णयावर नाराजी व्यक्त करत गिलने ट्विटर आणि इंस्टाग्रामवर पोस्ट केली होती. या दंडासह गिलला एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे.

WTC फायनलच्या पराभवानंतर ५ जणांची हकालपट्टी निश्चित, भारताच्या कसोटी संघात पुन्हा संधी नाही
गिलने खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठीच्या आयसीसीच्या आचार संहिता कलम २.७चे उल्लंखन केले आहे. हा नियम आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये होणाऱ्या घटनेवर सार्वजनिक टीका करण्यासंबंधीचा आहे.

आयपीएल ट्रॉफी घेऊन तिरुपतीच्या दर्शनाला, सीएसकेकडून खास पूजा

[ad_2]

Related posts